दिलासादायक : उत्तर सोलापूर तालुक्‍यात खरिपाची विक्रमी पेरणी; 30 ते 40 टक्के क्षेत्र वाढले 

दयानंद कुंभार 
सोमवार, 13 जुलै 2020

उत्तर सोलापूर तालुक्‍यात गेल्या काही वर्षात पाऊस वेळेवर पडत नसल्यामुळे खरीप हंगाम पेरणीची सरासरी 90 ते 100 टक्केच असायची. मात्र यंदा सुरवातीलाच 10 जूनला मृग नक्षत्र दमदार बरसले. यामुळे शिवारात पाणी-पाणी झाले होते. पावसाने उघडीप देताच यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी मोठ्या जोमात सुरू ठेवली आहे. यंदा 6 जुलैअखेर सोयाबीन, तूर, उडीद, भुईमूग, मूग, मका या पिकांची विक्रमी पेरणी झाली असून, खरीप हंगामाचे 30 टक्के क्षेत्र वाढले आहे. 

वडाळा (सोलापूर) : उत्तर सोलापूर तालुक्‍यात यंदा सुरवातीलाच मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे कोरडवाहू क्षेत्रावर खरीप हंगाम पेरणीचे क्षेत्र 132 टक्‍क्‍यांवर पोचले आहे. वेळेवर पडलेल्या पावसामुळे उत्तर तालुक्‍यात शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. 

हेही वाचा : धक्कादायक : कोरोनाची भीती नाही, देवी कोपणार म्हणून होतेय "या' परिसरात गर्दी! 

उत्तर सोलापूर तालुक्‍यात गेल्या काही वर्षात पाऊस वेळेवर पडत नसल्यामुळे खरीप हंगाम पेरणीची सरासरी 90 ते 100 टक्केच असायची. मात्र यंदा सुरवातीलाच 10 जूनला मृग नक्षत्र दमदार बरसले. यामुळे शिवारात पाणी-पाणी झाले होते. पावसाने उघडीप देताच यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी मोठ्या जोमात सुरू ठेवली आहे. यंदा 6 जुलैअखेर सोयाबीन, तूर, उडीद, भुईमूग, मूग, मका या पिकांची विक्रमी पेरणी झाली असून, खरीप हंगामाचे 30 टक्के क्षेत्र वाढले आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे उत्तर सोलापूर तालुका कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा : सोलापुरातील कोरोनाचा तावरेंनी रचला पाया, शिवशंकर चढवू लागले कळस 

कृषी विभागाने दिलेल्या पेरणीच्या आकडेवारीनुसार यंदा 6 जुलैपर्यंत तूर 1870 हेक्‍टर, सोयाबीन 2275 हेक्‍टर, उडीद 446 हेक्‍टर, मूग 201 हेक्‍टर, मका 424 हेक्‍टर, भुईमूग, बाजरी, सूर्यफूल व इतर कडधान्ये अशा एकूण 5500 हेक्‍टर क्षेत्रावर 132 टक्के पेरणी झाली असून आणखी अनेक ठिकाणी पेरणी अद्याप सुरू आहे. पेरणीच्या क्षेत्रात यंदा भरीव वाढ होणार असल्याचे उत्तर सोलापूर तालुका कृषी अधिकारी नंदकुमार पाचकुडवे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

यंदा तालुक्‍यावर वरुणराजाची कृपा 
उत्तर सोलापूर तालुक्‍यात यंदा जून महिन्यात शेळगी, तिऱ्हे, मार्डी, वडाळा, सोलापूर या पाचही मंडलात सरासरी 115 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना 127 मिलिमीटर पाऊस पडला. तर जुलैमध्ये 44 मिलिमीटर सरासरी पाऊस अपेक्षित असताना 10 जुलैअखेर 25 मिलिमीटर पाऊस झाला असून यामुळे सरासरी 123 मिलिमीटर पाऊस बरसला आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Record sowing of kharif in North Solapur taluka