निर्यातक्षम पिकांची मोबाईल ऍपद्वारे करा नोंदणी

logo
logo

सोलापूर : किडनाशक उर्वरित अंश व किड रोगमुक्त उत्पादनाची हमी देण्यासाठी अपेडाने निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी ग्रेपनेट, मॅंगोनेट, अनारनेट, सिट्रसनेट व व्हेजनेट या प्रणाली विकसित केलेल्या आहेत. या अंतर्गत शेतकऱ्यांना नोंदणी व नुतनीकरणासाठी अपेडाने विकसीत केलेल्या सुधारीत मानंक पद्धतीमधील नेक्‍झर 1 नुसार शेतकऱ्यांनी निर्यातक्षम पिकांची नोंदणी मोबाईल ऍपद्वारे करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. 

यापूर्वी ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे विहित प्रपत्रात अर्ज सादर केला जात होता. यावर्षी राज्याच्या निर्यातीस चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम बागांच्या नोंदणीचा लक्षांक कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेला आहे. 

राज्यातील फलोत्पादन उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातक्षम बागांची नोंदणी मोबाईल ऍपद्वारे करून जास्तीत जास्त कृषी उत्पादित मालाची निर्यात करावी. काही अडचणी आल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. माने यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com