मोठी बातमी : सोलापूर जिल्ह्यात येणारे सर्व रस्ते सील

अशोक मुरुमकर
Tuesday, 24 March 2020

नवीन सुधारित आदेशानुसार अत्यावश्‍यक सेवा पुरवणारी वाहने वगळता सायकल, मोटारसायकल, चारचाकीसह सर्व मोठ्या वाहनांवर बंदी घालण्यात आलेली आहे. अशी वाहने मिळून आल्यास पोलिस गुन्हा दाखल करून वाहने जप्त करतील व कोरोना व्हायरस संकट संपल्यानंतर कोर्टामार्फत वाहने परत दिली जाणार आहेत.

सोलापूर : कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी आता जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यातूनच सोलापूर जिल्ह्यात येणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. येथून बाहेरच्या जिल्ह्यातून प्रवेश केल्यास वाहने जप्त केली जाणार आहेत. पहिल्यांदा त्यांना व्यस्थीत सांगून सीमेवरुन माघारी पाठवले जाईल. त्यानंतर त्यांनी नाही ऐकले तर कारवाई केली जाणार आहे. 
यासह संचारबंदीच्या कालावधीत पोलिसांकडून न ऐकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यात काही वाहने जप्तही केली जात आहे.  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर फिरु नये असे आवाहनही करण्यात आले आहे.  याशीवाय सीआरपीसी 144 च्या सुधारित आदेशानुसार संचारबंदीच्या कालावधीत एखाद्याचे वाहन जप्त केले तर तुम्हाला परत प्रकीया पूर्ण झाल्यानंतर दिल जाणार आहे.
नवीन सुधारित आदेशानुसार अत्यावश्‍यक सेवा पुरवणारी वाहने वगळता सायकल, मोटारसायकल, चारचाकीसह सर्व मोठ्या वाहनांवर बंदी घालण्यात आलेली आहे. अशी वाहने मिळून आल्यास पोलिस गुन्हा दाखल करून वाहने जप्त करतील व कोरोना व्हायरस संकट संपल्यानंतर कोर्टामार्फत वाहने परत दिली जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात बाहेरच्या वाहनांना सध्या बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात बाहेर येणाऱ्या रस्त्यांचे सील करण्याचे काम सध्या सुरु आहे. त्याचप्रमाणे करमाळा तालुक्‍यातही बाहेरच्या जिल्ह्यातून वाहने येऊ नयेत म्हणून बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे सर्व रस्ते सील करण्याचे काम सुरु आहे. करमाळा तालुका ही सोलापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला आहे. येथून पुणे, उस्मानाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातून वाहने येतात. व सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात. पुणे जिल्ह्यातून भिगवणकडून तर नगर जिल्ह्यातून कोर्टी, जातेगाव व आळजापूर या गावात मुख्य रस्त्यावरुन प्रवेश होतो. अत्यावश्‍यक सेवेची वाहने सोडून इतर कोणत्याही वाहनांना बाहेरच्या जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. त्यांना जिल्हा बॉर्डरवरूनच माघारी पाठवले जाईल. हुज्जत घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची वाहने जप्त केली जातील. त्यांची वाहने कोरोना व्हायरसचे संकट संपल्यानंतरच कोर्टामार्फत परत मिळतील, याची सर्वांनी नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करमाळ्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी केले आहे.

Image may contain: Shrikaant A Padule, glasses

सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात इतर जिल्ह्यातून येणारे सर्व रस्ते आदेशानुसार सील केले आहेत. सरकारच्या निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- श्रीकांत पाडुळे,
पोलिस निरीक्षक, करमाळा

No photo description available.

सोलापूर जिल्ह्याची अशी आहे सीमा
करमाळा तालुक्यातून अहमदनगर, पुणे व उस्मानाबाद जिल्ह्यातील वाहने येतात. माळशीरस तालुक्यात सातारा व पुणे जिह्यातून वाहने येतात. माढा तालुक्यातून पुणे जिल्ह्यातून वाहने येतात. तर सांगोला, मंगळवेढा तालुक्यातून सांगली व सातारा जिल्ह्यातून वाहने येतात. पंढरपुर तालुक्यात सातारा जिल्ह्यातून वाहने येतात. तर बार्शी तालुक्यात उस्मानाबाद जिल्ह्यातून वाहने येतात. अक्कलकोट तालुक्यातून कर्नाटकमधील वाहने येतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The roads Seal coming to Solapur district