ही "आर्मी' करणार 45 दिवस तीन कोटी गरजवंतांना अन्नदान 

Robinhood Army
Robinhood Army

सोलापूर : यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केवळ एक दिवस मदत न पोचविता लॉकडाउनच्या संकटामुळे 1 जुलै ते 15 ऑगस्ट असे सलग 45 दिवस "बॅग ऑफ होप' या उपक्रमांतर्गत गरजू कुटुंबांना अन्नदानासह गहू, तांदूळ, डाळ, साखर, चहा, चिक्की, बिस्किटे, सॅनिटरी नॅपकिन, आर्सेनिक औषध, साबण, पेस्ट व तेल अशा अत्यावश्‍यक साहित्यांचे घरपोच वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती रॉबिनहूड आर्मीचे प्रमुख प्रा. हिंदुराव गोरे यांनी दिली. 

सोलापुरात केली चार लाख गरजूंना मदत 
सोलापुरातील हॉटेल, मंगल कार्यालये व कार्यक्रमांच्या ठिकाणी शिल्लक राहिलेले अन्न गरजूंना देणाऱ्या रॉबिनहूड आर्मी, सोलापूरच्या वतीने अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. कोरोनाच्या संकटामध्ये लॉकडाउनच्या काळात अन्न, अन्नधान्य व ज्येष्ठ नागरिकांना मदत पोचवणे अशा विविध उपक्रमांतून एकूण शहरात दोन लाख तर जिल्ह्यामध्ये पाच लाख गरजू लोकांना घरपोच मदत पोचवीत आतापर्यंत मागील चार वर्षांमध्ये शहरात कोणताही आर्थिक व्यवहार न करता सुमारे चार लाख गरजू लोकांना मदत केली आहे. 

या मोबाईल क्रमांकांवर साधा संपर्क 
या उपक्रमांतर्गत तीन कोटी भारतीयांना अन्नधान्य पोचविण्याचे उद्दिष्ट आहे. ज्यांची नोकरी गेली, वादळात घरे उद्‌ध्वस्त झाली, ज्यांना कोणताही आधार नाही, ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे घराबाहेर जाऊन काम करणे शक्‍य नाही अशा सर्वांना एक मदत मिळावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात योगदान देण्यासाठी 9272679797 व 9552646900 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. रॉबिनहूड आर्मीचे कार्य महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सातारा यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर, अक्कलकोट, मोहोळ, सांगोला व बार्शी या शहरांमध्ये सुरू आहे. मागील चार वर्षात लाखो लोकांना ही आर्मी जेवण देत आहे. 

हे घेत आहेत परिश्रम 
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिकेत चनशेट्टी, प्रा. संदीप लिगाडे, प्रा. संजीव म्हमाणे, अपूर्व जाधव, आकाश मुस्तारे, प्रेम भोगडे, सौरभ सिंदगी, विघ्नेश माने, समर्थ उबाळे, प्रियांका वडनाल, सूरज रघोजी, डोंगरेश चाबुकस्वार, अमोल गुंड, ऐश्वर्या जाजू, रवी चन्ना, नागेश मार्गम, धनंजय मुंडेवाडीकर, अभिजित खुणे, अभिषेक झंवर, आदित्य बालगावकर, स्वप्नील गुळेद, नरेश मलपेद्दी, प्रशांत गाजूल, अजय गंजी, आकाश मुस्के, चेतन शर्मा, अमरदीप सपार, अमित जनगोंड, निखील अंकुशे, विवेक नवले, प्रा. अमित कांबळे, अनुप कुरनूरकर, प्रवीण जिल्ला, अतुल कणसे, तुषार पामूल, समर्थ चिट्टे, दीपिका श्रीनिवासन, दिनेश लोमटे, दीपक मेंडीगिरी, कपिल मिठ्ठापल्ली, गीता राजानी, सुमीत पंडित, महेश बिराजदार, रजनीकांत जाधव, समप्रीत कुलकर्णी, जयश्री वाघमारे, विद्याश्री वाघमारे, यश डोंगरे, रोहित जकापुरे, त्रिशला चिडगुंपी, तौसिफ मुजावर, संदेश घोडके, तपन मंगलपल्ली, प्रतीक पुकाळे, सकलेन शेख, स्वामीराज बाबर, विनीत अवधूत, प्राजक्ता आठवले, सुरेखा बनसोडे, सुमीत भैरामडगी, सुमीत कोनापुरे, सौरभ पवार, सोहम जोशी, सोनल लोहे, सिद्धेश्वर लुबाळ, श्रीकांत महागावकर, सौरभ कुलकर्णी, संतोष आवळे, संदीप कुलकर्णी, संदीप जाधव, ऋतुजा अंदेली, ऋषी राजमान्य, राहुल वंगा, प्रतीक बाडोले, शुभम पत्तेवार, प्रशांत परदेशी,भोगडे, शुभम अक्षंताल, पंकज वाघमोडे, ओंकार केवते, नीलिशा अक्कलवाडे, मनीष हिरासकर, सुजित बिराजदार, प्रसाद कुलकर्णी, कृष्णा थोरात, प्रथमेश कोरे, जयेश रामावत, जगदीश वासम, वृषभ गुमटे, गोपाल नाडीगोटू, विलास शेलार, धीरज भोगडे आदी परिश्रम घेत आहेत. 

कोरोनाच्या संकटामुळे अनेक लोक अडचणीत आहेत. त्यांना आता खरी मदतीची गरज आहे, लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी जगभरामध्ये तीन कोटी गरजवंतांना अन्नधान्य वाटपाचे नियोजन असून, सोलापुरातही अगदी पेस्ट, साबणापासून अन्नधान्य व औषधांसह एक किट करून बॅग ऑफ होप उपक्रम राबवून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. 
- प्रा. हिंदुराव गोरे,
प्रमुख, रॉबिनहूड आर्मी, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com