#SaveMeritSaveNation : "रन फॉर मेरिट'मध्ये धावले शेकडो सोलापूरकर!

परशुराम कोकणे
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

आम्ही कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही. गुणवत्तेला प्राधान्य द्यावे अशी आमची मागणी आहे. 50 टक्के जागा या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी राखीव असाव्यात. अत्याधिक आरक्षणाच्या विरोधात आमचा लढा सुरू आहे. या अंतर्गत वेगवेगळ्या उपक्रमांसोबतच न्यायालयीन लढाही दिला जात आहे. रविवारी सोलापूरसह राज्यात विविध ठिकाणी रन फॉर मेरिटची दौड आयोजिली होती. सोलापुरातील दौडला तरुणांचा मोठा प्रतिसाद होता. 
- डॉ. साधना देशमुख, 
सदस्य, सेव्ह मेरिट संस्था

सोलापूर : मेरिट बचाओ.. राष्ट्र बचाओ.. चा नारा देत सेव्ह मेरिट संस्थेच्या वतीने रविवारी सकाळी रन फॉर मेरिटचे आयोजन करण्यात आले होते. 7 वर्षाच्या मुलांपासून 80 वर्षांच्या आजीपर्यंत शेकडो सोलापूरकरांनी एकत्र येऊन दौडमध्ये सहभाग नोंदविला. 

Image may contain: one or more people, people standing, crowd and outdoor

हरिभाई देवकरण प्रशाला परिसरातील मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट येथून रन फॉर मेरिट अंतर्गत धावण्यास सुरवात झाली. तत्पूर्वी विवेक कुलकर्णी यांनी वॉर्मअप घेतले. रंगभवन चौक, सात रस्ता, व्हीआयपी रोड, एम्प्लॉयमेंट चौक, डफरीन चौक मार्गे ही दौड पुन्हा मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट येथे आली. त्या ठिकाणी या उपक्रमाचा समारोप झाला. या उपक्रमात विविध महाविद्यालये आणि शाळांतील विद्यार्थ्यांसह जवळपास सातशे सोलापूरकर सहभागी झाले होते.

Image may contain: 3 people, people walking, crowd and outdoor

Image may contain: 8 people, people smiling, people standing and outdoor

याप्रसंगी विविध क्षेत्रांतील गुणवत्ता प्राप्त युवकांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमात संयोजक डॉ. विनायक देशपांडे, डॉ. संजय देशपांडे, डॉ. आदर्श मेहता, डॉ. प्रशांत औरंगाबादकर, सलाम शेख, कमलकिशोर फोफलिया, प्रशांत तवकिरी, डॉ. सुधांशू कोठडिया, डॉ. साधना देशमुख, डॉ. मधुरा बुरटे, कविता वाकडे, डॉ. रश्‍मी जोशी, मंजूषा गाडगीळ, डॉ. अतुल झंवर, प्रतीक मेहता, रोहित जाधव, मोहनीष पाटणकर, आदिती पाटणकर, राहुल शहा, नवाज बक्षी, वंदना कोपकर यांच्यासह शेकडो सोलापूरकर सहभागी झाले होते. 

Image may contain: 12 people, people smiling, people standing

आम्ही कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही. गुणवत्तेला प्राधान्य द्यावे अशी आमची मागणी आहे. 50 टक्के जागा या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी राखीव असाव्यात. अत्याधिक आरक्षणाच्या विरोधात आमचा लढा सुरू आहे. या अंतर्गत वेगवेगळ्या उपक्रमांसोबतच न्यायालयीन लढाही दिला जात आहे. रविवारी सोलापूरसह राज्यात विविध ठिकाणी रन फॉर मेरिटची दौड आयोजिली होती. सोलापुरातील दौडला तरुणांचा मोठा प्रतिसाद होता. 
- डॉ. साधना देशमुख, 
सदस्य, सेव्ह मेरिट संस्था

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Run For Merit at solapur