सोलापूरच्या ग्रामीण भागात आज 361 जण कोरोनाबाधित 

संतोष सिरसट 
Saturday, 5 September 2020

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 361 जण नव्याने कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. आज तीन हजार 647 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी तीन हजार 283 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 361 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज एकूण नऊ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 382 एवढी झाली आहे. कोरोनामुळे आता पर्यंत 13 हजार 210 जण बाधित जाले आहेत. 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 361 जण नव्याने कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. आज तीन हजार 647 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी तीन हजार 283 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 361 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज एकूण नऊ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 382 एवढी झाली आहे. कोरोनामुळे आता पर्यंत 13 हजार 210 जण बाधित जाले आहेत. 

आज मेहबूब नगर मोहोळ येथील 67 वर्षाचे पुरुष, सुभाष नगर बार्शी येथील 79 वर्षाचे पुरुष, आंधळगाव (ता. मंगळवेढा) येथील 70 वर्षाचे पुरुष, बावी (ता. बार्शी) येथील 85 वर्षाचे पुरुष, लऊळ (ता. माढा) येथील 65 वर्षाचे पुरुष, राऊत चाळ बार्शी येथील 75 वर्षांची महिला, बेलाटी (ता. उत्तर सोलापूर) येथील 80 वर्षाची महिला, कुर्डूवाडी येथील 72 वर्षाचे पुरुष तर उमरड (ता. करमाळा) येथील 60 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

या गावात आढळले नव्याने कोरोनाबाधित रुग्ण 
अक्कलकोट तालुक्‍यातील चपळगाव, बार्शीतील ऐनापूर मारुती, अलीपूर रोड, बालाजी नगर, बारंगुळे प्लॉट, बावी, चारे, दत्तबोळ, धामणगाव, धर्माधिकारी प्लॉट, धस पिंपळगाव, गाडेगाव रोड, गंगाडे चाळ, गवळी गल्ली, हळद गल्ली, हांडे गल्ली, जामगाव, जावळे प्लॉट, कासारवाडी रोड, कसबा पेठ, कुसळंब, लादुले गल्ली, मालवंडी, मांडेगाव, नागणे प्लॉट, नलावडे प्लॉट, नाळे प्लॉट, जुना रेल्वे स्टेशन जवळ, रातंजन, रुई, संभाजीनगर, सारोळे, शंकर नगर, शेळगाव, सुभाष नगर, तानाजी चौक, उपळे दुमाला, व्हणकळस प्लॉट, वाणी प्लॉट, झानपूर, करमाळ्यातील चिखलठाण, दत्त पेठ, देवीचा मळा, गणेश नगर, घोलपनगर, जामखेड रोड, जातेगाव, जेऊर, केतूर नंबर एक, केतूर नंबर दोन, कोर्टी, कृष्णाजी नगर, कुंकू गल्ली, महेंद्र नगर, मेन रोड करमाळा, पोथरे, संभाजीनगर, वाडेगाव, माढा तालुक्‍यातील बारलोणी, चिंचवाडी, कुर्डूवाडी, महतपूर, म्हैसगाव, मोडनिंब, नगरोळी, रिधोरे, संमती नगर, शिवाजीनगर माढा, वाकाव, यशवंतनगर, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, भांबुर्डी, बोंडले, चाकोरे, फोंडशिरस, खुडूस, माळीनगर, मानकी, नातेपुते, पुरंदावडे, सदाशिव नगर, संग्राम नगर, शिवाजी चौक, स्टेट बॅंकेजवळ, वाटपली, वेळापूर, वाघमोडे वस्ती, यशवंतनगर, मंगळवेढ्यातील आशीर्वाद हॉस्पिटल, ब्रह्मपुरी, भूमी अभिलेख कार्यालय, दामाजी नगर, डिकसळ, खुपसंगी, एमएईबी, रेड्डे, सराफ गल्ली, शरद नगर, मोहोळ मधील अण्णाभाऊ साठे नगर, अजनसोंड, बेगमपूर, हिंगणी, लांबोटी, पाटकुल, सौंदणे, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील पाकणी, पंढरपुरातील आंबे, अनिल नगर, अनवली, भाळवणी, भंडीशेगाव, भोसे, चळे, चिंचोली भोसे, दाळे गल्ली, देवडे, डोंबे गल्ली, गादेगाव, गोपाळपूर, गुरसाळे, इसबावी, ईश्वरवठार, करकंब, कासेगाव, कोर्टी, लक्ष्मी टाकळी, लिंक रोड, नांदोरे, नवीपेठ, तांबडा मारुती, पळशी, परिचारक नगर, पिराची कुरोली, शेटफळ, सुस्ते, तुंगत, उमदे गल्ली, वाखरी येळे वस्ती, सांगोल्यातील भिमनगर, धायटी, एकतपूर, गणेश मंदिराजवळ, हातीद, जय भवानी चौक, जुनोनी, कडलास नाका, खेडबिसरी, लोहार गल्ली, मेन रोड, मेडशिंगी, नरळेवाडी, नाझरे, शिवणे, वासूद रोड, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील भंडारकवठे या गावांमध्ये आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the rural areas of Solapur, 361 people were infected today