सोलापूरच्या ग्रामीण भागात एकाच दिवसात सर्वाधिक 513 कोरोनाबाधित 

सोलापूरच्या ग्रामीण भागात एकाच दिवसात सर्वाधिक 513 कोरोनाबाधित 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक 513 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्याचबरोबर आज सर्वाधिक 16 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाने बळी पडलेल्यांची संख्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 411 एवढी झाली आहे. आतापर्यंत 14 हजार 185 जण कोरोनाबाधित झाल्याचे आज आलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. 

आज एकूण तीन हजार 17 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी दोन हजार 504 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 513 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज 16 जणांचा मृत्यू झाला आहे. अकलूज (ता. माळशिरस) येथील 72 वर्षाची महिला, गिरझणी (ता. माळशिरस) येथील 63 वर्षाचे पुरुष, कुर्डूवाडी येथील 66 वर्षांची महिला, आलेगाव कणबस (ता. दक्षिण सोलापूर) येथील 72 वर्षाचे पुरुष, अकलूज येथील 55 वर्षाचे पुरुष, फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील 48 वर्षाचे पुरुष, इसबावी (ता. पंढरपूर) येथील 70 वर्षाची महिला, खर्डी (ता. पंढरपूर) येथील 61 वर्षाचे पुरुष, वडाचीवाडी (ता. माढा) येथील 55 वर्षाचे पुरुष, करकंब (ता. पंढरपूर) येथील 70 वर्षाची महिला, मंगरुळ (ता. अक्कलकोट) येथील 72 वर्षाचे पुरुष, सलगर खुर्द (ता. मंगळवेढा) येथील 40 वर्षाचे पुरुष, भक्ती मार्ग पंढरपूर येथील 66 वर्षांची महिला, लक्ष्मीनगर पंढरपूर येथील 60 वर्षाची महिला, कुंभार गल्ली मंगळवेढा येथील 70 वर्षाचे पुरुष तर कोंढारपट्टा (ता. माळशिरस) येथील 70 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

या गावात आढळले कोरणा बाधित रुग्ण 
अक्कलकोट तालुक्‍यातील दोड्याळ, किणी, मैंदर्गी, बार्शीतील गाडेगाव रोड, अध्यापक कॉलनी, अलीपूर रोड, आझाद चौक, बारंगुळे प्लॉट, बेडराई गल्ली, भोसले चौक, ढगे मळा, फाफळवाडी, गाडेगाव रोड, गोंडील प्लॉट, हिंगणी, जावळे प्लॉट, कासारवाडी रोड, खामगाव, कुर्डूवाडी रोड, लोखंड गल्ली, भांडेगाव, नागणे प्लॉट, नाळे प्लॉट, माडेकर हॉस्पिटल जवळ, नाकोडा प्लास्टिक जवळ, पांगरी, पंकज नगर, सोलापूर रोड, सुभाषनगर, तानाजी चौक, उपळे दुमाला, उपळाई रोड, उपळाई, करमाळ्यातील भागवान नगर, गुळसडी, हिरडे प्लॉट, कमलाई नगर, कृष्णाजी नगर, मुठा नगर, पोथरे, राशिन पेठ, संभाजी नगर, साठे नगर, शाहुनगर, शेळगाव, श्रीदेवीचा माळ, सिद्धार्थनगर, उमरड, वीट, वाशिंबे, माढा तालुक्‍यातील आंबड, बावी, भोसरे, चांदवडी, दास प्लॉट, कुर्डूवाडी, लऊळ, म्हसोबा गल्ली, मोडनिंब, पिंपळनेर, रोपळे, शिवाजी चौक, सोलंकरवाडी, टेंभुर्णी, उघडे वस्ती, वडाचीवाडी, वडशिंगे, यशवंतनगर, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, आनंदनगर, बागेची वाडी, बोरगाव, दहिगाव, एकशिव, गारवाड, गिरझणी, खुडूस, कोंडबावी, लवंग, मळोली, मुळेवाडी, माळीनगर, मांडवे, मानकी, मोराची, नातेपुते, पळसमंडळ, संग्रामनगर, श्रीपूर, सुजयनगर अकलूज, तांबवेवाडी, वेळापूर, यशवंतनगर, मंगळवेढ्यातील भिमनगर, चेळेकर गल्ली, चोखामेळा नगर, हजारे गल्ली, खुपसंगी, किल्ला बाग, लमाण तांडा, मानेवाडी, मित्रनगर, नर्मदा पार्क, आरएच क्वार्टर जवळ, पंचायत समिती, रेड्डे, सलगर, सुतार गल्ली, मोहोळ तालुक्‍यातील अनगर, भांबेवाडी, कळसे नगर, नजीक पिंपरी, समर्थनगर, येवती, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील हगलूर, पंढरपूर तालुक्‍यातील अढीव, आंबेडकर नगर, अनिल नगर, अनवली, आशीर्वाद विठ्ठल नगर, बाभुळगाव, बादुले चौक, भाळवणी, भोसले चौक, काळे गल्ली, डोंबे गल्ली, गादेगाव, गोपाळपूर, गुरसाळे, इसबावी, जगदंबा नगर, जुना कराड नाका, जुनी वडार गल्ली, करकंब, कासेगाव, खर्डी, खरसोळी, खेड, भोसे, कोर्टी, लक्ष्मी टाकळी, लिंक रोड, मंगळवेढेकर नगर, नागपूरकर मठाजवळ, नवीन कराड नाका, पंचमुखी मारुती मंदिराजवळ, पळशी, परदेशी नगर, पिराची कुरोली, पुळूज, रुक्‍मिणी नगर, सांगोला चौक, सांगोला रोड, संतपेठ, शासकीय वसाहत, शेळवे, सिद्धेवाडी, सिद्धिविनायक सोसायटी, तपकिरी शेटफळ, तारापूर, तावशी, तिसंगी, उमदे गल्ली, वाखरी, झेंडे गल्ली, सांगोल्यातील अलराईन नगर, बामणी, भिमनगर, एकतपूर, हलदहिवडी, हातीद, कडलास नाका, कडलास, खडतरे गल्ली, कोष्टी गल्ली, महुद, मार्केट यार्ड, मेडशिंगी, नाझरे, सुर्यातेज नगर, वाणी चिंचाळी, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कणबस, मंद्रूप या ठिकाणी आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com