सकाळ इफेक्‍ट ! 'त्या' वैद्यकीय अधिकाऱ्याची लावली चौकशी; ! 'कुटूंब माझी जबाबदारी'चे अर्धवट भरलेले अर्ज घेतले माघारी

तात्या लांडगे
Monday, 12 October 2020

संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या चौकशीचे दिले आदेश
'माझे कुटूंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत को-मॉर्बिड रुग्णांचे तापमान, ऑक्‍सिजन लेव्हल तपासणीचा सर्व्हे बुधवारपासून (ता. 14) सुरु होईल. साबळे नागरी आरोग्य केंद्रातील प्रकारानंतर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांच्यावर निश्‍चितपणे कारवाई केली जाईल. 
- पी. शिवशंकर, महापालिका आयुक्‍त, सोलापूर 

 सोलापूर : 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व्हे करणाऱ्यांनी घरोघरी जाऊन त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्‍तीचे वय, त्याचा आजार, त्याच्यातील लक्षणे, तापमान व ऑक्‍सिजन लेव्हलची नोंद पारदर्शकपणे करणे अपेक्षित आहे. मात्र, साबळे नागरी आरोग्य केंद्रासह अन्य काही केंद्रातील कर्मचाऱ्यांनी कुटुंबातील व्यक्‍तींची नावे, त्यांचे वय नोंदविले. परंतु, उर्वरित माहिती न नोंदविताच अंदाजे माहिती भरून ते अर्ज मोबाईलद्वारे ऑनलाइन भरण्याचा प्रकार 'सकाळ'ने समोर आणला. त्यानंतर आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढत त्यांची चौकशी लावली आहे. 

शहरातील रुग्णसंख्या आटोक्‍यात यावी आणि को-मॉर्बिड रुग्ण कोरोनाचे बळी ठरू नयेत म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नवी मोहीम सुरु केली. त्याअंतर्गत सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना पारदर्शक सर्व्हेच्या सक्‍त सूचना केल्या. मात्र, काही वैद्यकीय अधिकारी कार्यालयात बसून सर्व्हे न करताच संबंधित कर्मचाऱ्यांकडून अंदाजित माहिती भरून घेत आहेत. को-मॉर्बिड व्यक्‍तींचा सर्व्हे बाजूला ठेवून अगोदर ऑनलाइन अर्ज सबमिट करा. आयुक्‍तांना त्याचा अहवाल तत्काळ द्यायचा आहे, असे साबळे नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितल्याची व्यथा काही शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर 'सकाळ'कडे कथन केली. 

ठळक बाबी... 

  • को-मॉर्बिड रुग्ण कोरोनाचे बळी ठरु नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुरु केली 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' मोहीम 
  • शहरात 60 हजारांहून अधिक को-मॉर्बिड रुग्ण; त्यांच्यावर देखरेख ठेवणे मोहिमेचा आहे मुख्य हेतू 
  • शासनाला रिपोर्ट द्यायचा असल्याने को-मॉर्बिडचा सर्व्हे ठेवला बाजूला; तीनशेहून अधिक अर्ज अंदाजेच ऑनलाइन भरले 
  • शहरातील मृतांची संख्या 503 ; को-मॉर्बिड रुग्णांचाच सर्वाधिक समावेश 
  • ऑनलाइन अर्ज भरण्याची जबाबदारी शिक्षकांवरच; महापालिका आयुक्‍तांनी घेतला निर्णय 

संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या चौकशीचे दिले आदेश
'माझे कुटूंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत को-मॉर्बिड रुग्णांचे तापमान, ऑक्‍सिजन लेव्हल तपासणीचा सर्व्हे बुधवारपासून (ता. 14) सुरु होईल. साबळे नागरी आरोग्य केंद्रातील प्रकारानंतर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांच्यावर निश्‍चितपणे कारवाई केली जाईल. 
- पी. शिवशंकर, महापालिका आयुक्‍त, सोलापूर 

 
आमची उडाली झोप; दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी 
आशासेविकांसह ऑनलाईनचे काम करण्यासाठी वेतनावर दहा कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले आहेत. तरीही शिक्षकांना को-मॉर्बिडचा सर्व्हे सोडून तेच ऑनलाइन काम का देण्यात आले, याचे उत्तर संबंधित नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावेच लागेल, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साबळे नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना इशारा देण्यात आला. 'सकाळ'मध्ये बातमी आल्याने सर्वच अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ज्यांनी अर्ज भरले त्याचे काय, या प्रश्‍नाचे उत्तर मिळू शकलेले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal effect ! An inquiry into medical officer; Withdraw half-filled application for 'Family My Responsibility'