परिस्थितीवर मात करत समर्थ झाला सीए

Salapurs Samarth Deshpande overcome the situation and CA
Salapurs Samarth Deshpande overcome the situation and CA

सोलापूर : घराच्या परिस्थितीवर मात करत फक्त इच्छा शक्ती आणि जिद्दीच्या जोरावर समर्थ देशपांडे हे सीए परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. पहिल्यांदा त्यांना अपयश आले, मात्र त्यात ते खचून गेले नाहीत. दुसऱ्यांदा नवीन जोमाने त्यांनी अभ्यास केला त्यातही त्यांना यश मिळाले नाही. तरीही त्यांनी चिकाटी सोडली नाही. आपण कोठे कमी पडत आहोत यावर लक्ष देऊन त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले. देशपांडे आसरा येथे राहतात.

त्यांचे वडील बॉण्ड राईटर आहेत. घरात आई, आजी व लहान भाऊ आहे. दहावीमध्ये ते नापास झाले. त्यानंतर त्यांनतर त्यांना नातेवाईक हिणवू लागले. तेव्हाच त्यांनी जिद्द बाळगून ऑक्‍टोबरच्या परीक्षेत यश मिळवले. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण हरीभाई देवकरण प्रशालेत झाले आहे. दहावी पास झाल्यानंतर अण्णासाहेब पाटील महाविद्यालयात वाणिज्य शाखेतून त्यांनी अकरावी व बारावीचे शिक्षण पुर्ण केले.

क्कादायक का गेली लालपरी आगीच्या खाईत बारावीत चांगले गुण मिळाल्यावर काय करायचे असा प्रश्‍न होता. परिस्थितीमुळे काय करायचे त्यावर मर्यादा होत्या. पैसा जवळ नसल्याने त्याने सीए होण्याचे ठरवले. सीएसाठी लागणरी सीपीटी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात ते पास झाला. त्यानंतर सीएच्या परीक्षेत दोन वेळा अपयश आले. मात्र अपयशाने खचून न जाता. त्यांनी अभ्यास करून तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवले. घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी सीएचा अभ्यास करत असतानाच मिळेल ते काम केले. काम करत असताना त्यांनी अभ्यासात खंड पडू दिला नाही. त्यांनी खासगी कंपनीत व सीएकडे काम करून वडिलांना मदत केली. त्यातून त्यांचा शिक्षणाचा काही प्रमाणशत खर्च भागला. परीक्षेच्या आगोदर दोन महिने त्यांनी रजाकाडून रात्रंदिवस अभ्यास केला. आणि यश मिळवले आहेत. सीए सुदर्शन पुकाळे, सुनील इंगळे, किरण संगम यांनी त्यांना मार्गदर्शन केले. हेही वाचा : राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी दीपक सांळुखे-पाटील जिद्दीने परिस्थितीवर मात केली समर्थला सीएच करायचे होते असा घरातील सदस्यांचा आग्रह होता. जगण कठीण असताना देखील त्याने जिद्दीने घरतील परिस्थितीवर सह नातेवाईकांनी अपमान केला तरी त्याकडे लक्ष न देता. अभ्यास करून त्याने सीएची परीक्षा पास झाली त्याचा अभिमान वाटतो. प्रकाश देशपांडे, वडिल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com