मंगळवेढा तालुक्यात मंडलाधिकारी, तलाठ्याला सरपंचाकडून जीवे मारण्याची धमकी

Sarpanch threatens circle and talatta in Mangalvedha taluka
Sarpanch threatens circle and talatta in Mangalvedha taluka

मंगळवेढा (सोलापूर) : वाळू चोरीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मंडलाधिकारी व तलाठ्यास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पौटच्या सरपंचासह व दोन पुत्रास एक दिवसाची न्यायाधीश जी. एम. चरणकर यांनी पोलिस कोठडी सुनावली.
हुलजंती महसूल मंडलच्या अंतर्गत येणाऱ्या पौट येथील ओढ्यातून बेकायदेशीररित्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असून दस्तुरखुद्द सरपंचाचा ट्रॅक्टर यात वाळू उपसा करत असल्याची माहिती महसूल खात्यास मिळाली. कारवाईसाठी मंडलाधिकारी सत्यवान घुगे व गाव कामगार तलाठी आर. एल. खोमणे हे येथे गेले. तेव्हा सरपंच राजाराम जगन्नाथ निमगिरे, राहुल राजाराम निमगिरे व प्रविण राजाराम निमगिरे यांच्या ताब्यातील बिगर नंबरचा ट्रॅक्टर व ट्रॉली तून पौट ते सलगर खुर्द रस्त्यावर निमगिरे वस्ती जवळ वाळू उपसा करत असताना दिसून आले. यावेळी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी त्यांना वाळू उपशाच्या परमिटबाबत विचारलं असता त्यांच्या ताब्यातील टॅक्टरमध्ये

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 एक ब्रास वाळूबाबत ( किंमत पाच हजार) कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्यामुळे त्यांनी सदरचा ट्रॅक्टर पोलिस स्टेशनला घेऊन जाण्यास सूचना केली असता सरपंच व त्यांच्या दोन मुलाने ट्रॅक्टर घेवून येण्यास विरोध केला. त्यावेळी त्यांनी शिवीगाळ करत मारहाण केले. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. दरम्यान ट्रॅक्टरची चावी काढून घेतली असता त्यांनी टेस्टरच्या साह्याने ट्रॅक्टर सुरु करून निघून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असताना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पौट येथील ओढ्यातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून या भागातील अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. कोरोनाच्या पोलिस व इतर अधिकारी गुंतल्यामुळे वाळू चोरी करणार ना रान मोकळे झाले. महसूल खात्याने केलेल्या कारवाईत दस्तुरखुद्द सरपंच ह्या वाळू चोरी प्रकरणात सापडल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com