#ScienceDay : ...तरच विज्ञान ठरेल वरदान! 

#ScienceDay : ...तरच विज्ञान ठरेल वरदान! 

सोलापूर : नवनवीन पद्धतींचा, दररोज अपडेट होणाऱ्या टेक्‍नॉलॉजीचा वापर करून लोकांची ऑनलाइन फसवणूक केली जात आहे. विज्ञानाचा वापर जसा माणसाच्या प्रगतीला पोषक तसाच तो विनाशाला कारणीभूत ठरत आहे. सायबर गुन्हे कमी करण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करत आहेच, नागरिकांनी सदैव दक्ष असण्याची गरज आहे. 

सर्प रक्षकांनी सांभाळलेल्या अंड्यातून बाहेर आली पिल्लं! 

माणसाची आळशी वृत्ती
आज सर्वजण मोबाईल, इंटरनेटचा वापर करत आहेत. माणसाची आळशी वृत्ती मोबाईलच्या वाढत्या वापराला कारणीभूत आहे. सर्वगोष्टी घरबसल्या मिळाव्यात अशी आपली मानसिकता आहे. बॅंकेच्या रांगेत थांबण्याऐवजी आपण नेटबॅंकिंग वापरतो, घरी जेवण बनवायचा कंटाळा आला की ऑनलाइन मागवतो. बाजारात 10 दुकाने फिरून वस्तू घेण्याऐवजी अपेक्षित वस्तू ऑनलाइन खरेदी करता येत आहे. एवढंच काय तर लग्न देखील ऑनलाइन होत आहे. याचा विचार केला असता असे वाटते की विज्ञान वरदान आहे. 

जिल्हा सरकारी वकील पदासाठी महाविकास आघाडीच्या समर्थकांची फिल्डिंग

दररोज नवनवीन शोध
परंतु, आपण सर्व सुविधा वापरतो म्हणजे आपल्याला इंटरनेट किंवा मोबाईलची सर्व माहीत आहे असे नाही. आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टीचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार ऑनलाइन गुन्हे करत आहेत. विज्ञान, तंत्रज्ञानात दररोज नवनवीन शोध लागतात. त्या गोष्टी माणसाच्या दैनंदिन जीवनात वापरात येतात आणि त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. सायबर गुन्ह्यांत आरोपींचा शोध घेणे वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे नव्या माध्यमांचा म्हणजेच विज्ञानाचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. 

लहानपणी शाळेत असताना निबंध असायचा विज्ञान शाप की वरदान. सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या आणि नवनवीन प्रकार पाहून आज विज्ञान दिनी हाच प्रश्‍न पडतो की मोबाईल, इंटरनेट हे सर्व आपल्यासाठी शाप आहेत की वरदान. स्वत:च्या चुकीमुळे लोकांचे ऑनलाइन माध्यमातून गेलेले पैसे परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश येत असले तरी फसवणुकीचे विविध प्रकार आणि पैसे गेल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. नागरिकांनी दक्षता घेतली तरच सायबर क्राइमवर नियंत्रण आणणे शक्‍य आहे. 
- विशेंद्रसिंग बायस, 
पोलिस उपनिरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com