सोलापूर बाजार समितीचे सचिव दळवी निवृत्त, नवीन सचिव निवडण्याचे अधिकार सभापती विजयकुमार देशमुखांना 

logo
logo

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उमेश दळवी हे 34 वर्षांच्या सेवेनंतर आज निवृत्त झाले. बाजार समितीचे नवीन सचिव कोण असावेत? याबाबतचा संपूर्ण अधिकार बाजार समितीचे सभापती भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना देण्यात आला आहे. समितीच्या संचालक मंडळाची बैठक आज झाली. या बैठकीत नवीन सचिव निवडीचे अधिकार हे आमदार देशमुख यांना देण्यात आले आहेत. 

त्यांच्या निवृत्ती बद्दल आज बाजार समितीच्या संचालक मंडळात त्यांचा सन्मान करण्यात आला. सभापती व 0आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. बाजार समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्यावतीनेही उपसचिव दत्तात्रेय सूर्यवंशी व सिद्धेश्वर राजमाने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे, संचालक दिलीप माने, जितेंद्र साठे, प्रकाश चोरेकर, प्रकाश वानकर, शिवानंद पुजारी, बसवेश्वर अटकळे, नामदेव गवळी, राजकुमार वाघमारे, विजया भोसले, रामप्पा चिवडशेट्टी, इंदुमती आलगोंड - पाटील, वसंत पाटील व बाळासाहेब शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com