रस्त्याची दुरावस्था पाहून ग्रामस्थांनी वाहने रोखून व्यक्त केला संताप 

हुकूम मुलानी
Sunday, 25 October 2020

याबाबत सविस्तर हकीकत अशी की रत्नागिरी- नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम तालुक्‍यात सुरू असून या कामासाठी दिलीप बिल्डकॉन या कंपनीचा मंगळवेढ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर खोमनाळ रोडला ठेकेदारांनी त्याच्या वाहनतळ व रस्त्यासाठीच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याचा उद्योग असून जिल्हा मार्ग क्र 73 वरून 40 ते 50 टनाची अवजड वाहने लगतच्या गावातून मोठे दगड, खडी, मुरूम वाहतूक या मंगळवेढा ते खोमनाळ हिवरगाव,पाठखळ भाळवणी या रस्त्यावरून केली जात आहे. 

मंगळवेढा(सोलापूर):  रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील ठेकेदाराकडून कच्च्या मालाच्या वाहतूककीसाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था केल्यामुळे संतप्त झालेल्या खोमनाळ ग्रामस्थांनी आज वाहने रोखून संताप व्यक्त केला. 

हेही वाचाः शाळा सोडलेला मुलगा झाला मेजर, दुसरा मॅनेजर शिक्षिका वैशाली डोंबाळे यांनी दिला मदतीचा हात 

याबाबत सविस्तर हकीकत अशी की रत्नागिरी- नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम तालुक्‍यात सुरू असून या कामासाठी दिलीप बिल्डकॉन या कंपनीचा मंगळवेढ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर खोमनाळ रोडला ठेकेदारांनी त्याच्या वाहनतळ व रस्त्यासाठीच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याचा उद्योग असून जिल्हा मार्ग क्र 73 वरून 40 ते 50 टनाची अवजड वाहने लगतच्या गावातून मोठे दगड, खडी, मुरूम वाहतूक या मंगळवेढा ते खोमनाळ हिवरगाव,पाठखळ भाळवणी या रस्त्यावरून केली जात आहे. 

हेही वाचाः विजयादशमीनिमित्त श्री विठल रुक्‍मिणी मंदिर पिवळ्या धमक झेंडूच्या फुलांनी निघाले न्हाऊन 

या अवजड वाहनांमुळे हा रस्ता पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले. सदरचा रस्त्याच्या दुरुस्तीबाबत दिलीप बिल्डकॉन कंपनीने करारात ठरल्याप्रमाणे काम केलें नसल्याबाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कंपनीला देण्यात आले. नवीन रस्ता करून देण्याबाबत चे पालन केले नाही परंतु कंपनीकडे त्या पत्राकडे दुर्लक्ष केले. सदर खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून लक्ष दिले जात नाही शिवाय संबंधित ठेकेदाराकडून तात्पुरत्या स्वरूपात मुरमाची मलमपट्टी केली जात असल्यामुळे यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वारंवार या संबंधित अधिकारी विभागाला सूचना देऊन देखील या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन वाहने रोखून धरण्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम उपविभाग मंगळवेढा यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला परंतु यावर कोणतीही हालचाल न केल्यामुळे आज सकाळी या ठेकेदाराची कच्चा मालाच्या वाहतूकीसाठी चाललेले वाहने रोखून धरून ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला आहे  

संपादनः प्रकाश सनपूरकर 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seeing the bad condition of the road, the villagers stopped their vehicles and expressed their anger