ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या 35 विद्यार्थ्याची टीसीएस कंपनीत निवड 

orchid college.jpg
orchid college.jpg

सोलापूरः येथील एन.के. ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजीच्या 35 विद्यार्थ्यांची टीसीएस या राष्ट्रीयस्तरावरील नामांकित कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार यांनी दिली. 
टाटा कन्स्ल्टंसी सर्व्हिसेस या जागतिक आय.टी. सर्व्हिसेस कंपनीने अभियंत्यांच्या निवडीसाठी कॅम्पस रिक्रूटमेंट प्रोसेसमध्ये अमुलाग्र बदल केला आहे. संपूर्ण भारतातून नॅशनल क्वालिफायर टेस्ट ( एनक्‍यूटी) ही एकच परीक्षा टीसीएसतर्फे घेतली जाते. यामध्ये देशभरातून लाखो अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी या टेस्टमध्ये सहभाग नोंदवला. त्यातून साधारणत: 25 ते 30 हजार विद्यार्थी निवडले जातात. या परिक्षेत यश मिळवणाऱ्या ऑर्किड अभियांत्रिकीच्या 35 विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली. 
टीसीएस बरोबरच टीआयएए या अग्रमानांकित कंपनीमध्ये 7 लाख पॅकेजसाठी 20 विद्यार्थ्यांची निवड झाली. इन्फोसिसमध्ये 13 विद्यार्थी निवडले गेले आहेत. परसिसटंटमध्ये 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हे सर्व विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्स, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, मेकॅनिकल, इलेक्‍ट्रीकल सर्व या शाखेतील असून 2020-21 मध्ये ते बी.टेक पदवी पूर्ण करणार आहेत. 
ऑर्किड महाविद्यालय विद्यार्थींच्या द्वितीय वर्षापासूनच सॉफ्टस्कील्स व ×ऍप्टीट्युड ट्रेनिंगचा वेळापत्रकात अंतर्भाव केल्याने आम्ही हे यश संपादन करू शकलो, अशी प्रतिक्रिया निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी दिली. त्यांनी सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी मन:पूर्वक आभार मानले. अंतिम वर्षात शिकत असतानाच आमच्या पाल्यांची प्लेसमेंट झाल्याने सर्व पालकांनी आनंद व्यक्त केला व महाविद्यालयाचे आभार मानले. ऑर्किडच्या या यशाबद्दल सर्व मॅनेजमेंट प्रतिनिधी, प्राचार्य डॉ. जे.बी. दफेदार, अधिष्ठाता ट्रेनिंग व प्लेसमेंट डॉ. आर.आर. पाटील यांनी अभिनंदन केले. 


नियमित अभ्यासाचे यश 
मार्च महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने संपूर्ण जग हे ठप्प असताना विद्यार्थ्यांची अतिशय शिस्तबध्द ऑनलाईन ट्रेनिंग घेतल्याने हे यश संपादन करता आले. या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये टीसीएसच्या निवड प्रक्रियेतील र्व्हबल, ऍप्टीटयुड, प्रोग्रॅमींग व कोडींग या सर्व बाबीवर विद्यार्थ्यांचे नियमीत ट्रेनिंग व टेस्ट ऑर्किड महाविद्यालयाने ऑनलाईन पध्दतीने राबविल्या. सोलापुरात राहून सुध्दा विद्यार्थी देशातील मोठ-मोठ्या कंपन्यामध्ये आपल्या मेहनतीमुळे व योग्य मार्गदर्शनामुळे नोकरी मिळवू शकतात हेच ऑर्किड अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com