भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या युवा कमिशनमध्ये महाराष्ट्राच्या नामदेव शिरगावकर यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये सहसचिव पदावर कार्यरत असलेले मुंबईचे नामदेव शिरगावकर यांना आता महाराष्ट्रासह देशातील युवा खेळाडू घडवण्याची संधी मिळाली आहे.  भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून (आयओए) शनिवारी युथ कमिशन या समितीतील चारजणांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील नामदेव शिरगावकर यांच्यासह दुश्यंत चौटाला, विराज दास आणि चांदसिंग टोकस यांचा समावेश आहे.

सोलापूर : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये सहसचिव पदावर कार्यरत असलेले मुंबईचे नामदेव शिरगावकर यांना आता महाराष्ट्रासह देशातील युवा खेळाडू घडवण्याची संधी मिळाली आहे.  भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून (आयओए) शनिवारी युथ कमिशन या समितीतील चारजणांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील नामदेव शिरगावकर यांच्यासह दुश्यंत चौटाला, विराज दास आणि चांदसिंग टोकस यांचा समावेश आहे.
नामदेव शिरगावकर हे इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष असून भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव आहेत. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये सर्वात युवा पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. भारतीय ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी नामदेव शिरगावकर यांच्यावर विश्वास दाखवताना पुन्हा एक नवीन जबाबदारी दिली आहे. या युथ कमिशनच्या अध्यक्षपदी हरियाणाचे उपमुख्यमंत्री तथा भारतीय टेबल टेनिस महासंघाचे अध्यक्ष दुशांत चौटाला यांचा अनुभव नामदेव शिरगावकर यांना उपयोगी पडणार आहे. भारत हा युवकांचा देश आहे. भविष्यातील ऑलिंपियन्स या युवकांमधून शोधून त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी या युवा कमिशनच्या माध्यमातून भारतीय आॕलंम्पिक असोशिएशनचे अध्यक्ष श्री. बात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाली असून गुणवंत युवा आॕलंम्पियन्स शोधण्याचे व त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य यशस्वीपणे पार पाडेल, असा विश्वास यावेळी श्री. शिरगावकर यांनी व्यक्त केला आहे.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ही समिती युवा खेळाडूंमधील गुण हेरुन त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करणार आहे. ज्या खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे, अशा होतकरू खेळाडूंना शोधून ते या युवकांना दिशा देणार आहेत. भारतातील युवा क्रीडा शक्ती घडवण्याचे काम आयओएने या समितीवर सोपवले आहे. भारतीय आॕलंम्पिक असोशिएशन चे अध्यक्ष श्री. बात्रा यांनी युथ कमिशनच्या अध्यक्षपदी हरियाणाचे उपमुख्यमंत्री तथा टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष  दुश्यंत चौटाला यांच्यासह बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष विराज दास , इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर व चांदसिंग टोकस यांची चार सदस्यीय समितीमध्ये निवड करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selection of Namdev Shirgaonkar in the Youth Commission of the Indian Olympic Association