शरद पवारांनी लक्ष घातले अन्‌ ‘या’ जिल्ह्यातील वीजेचा प्रश्‍न सुटला; काय आहे पत्र वाचा

अशोक मुरुमकर
Sunday, 14 June 2020

सर्वात कमी प्रजर्नन्यमान असताना सुद्धा केवळ उजनी धरणाने सोलापूर जिल्ह्याला वैभव मिळवून दिले. माढा तालुक्यात हे धरण येत असले तरी यासाठी करमाळा तालुक्याचा सर्वात जास्त त्याग आहे. सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस पडला तरी पुण्यात झालेल्या पावसाने उजनी धरण भरते.

सोलापूर : सर्वात कमी प्रजर्नन्यमान असताना सुद्धा केवळ उजनी धरणाने सोलापूर जिल्ह्याला वैभव मिळवून दिले. माढा तालुक्यात हे धरण येत असले तरी यासाठी करमाळा तालुक्याचा सर्वात जास्त त्याग आहे. सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस पडला तरी पुण्यात झालेल्या पावसाने उजनी धरण भरते. मात्र, फक्त उजनी धरण भरुन उपयोगाचे नाही तर ते पाणी शेतात जाणे अवश्‍यक होते. यासाठी शरद पवारांनी लक्ष घातले आणि केवळ एका पत्राची दखल घेत वीजेचा प्रश्‍न मार्गी लावला.

हेही वाचा : ‘या’ नेत्याने सांगितले अन्‌ उजनी धरणाची जागा बदलली; खरी जागा तुम्हाला माहितीये का? 
सोलापूर जिल्ह्यात १९६९ ला उजनी धरण बांधण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जून १९८० ला उजनी धरण पूर्ण झाले. उजनी धरणाचा सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील इंदापूर, भिगवण, कुंरकुंभलाही उपयोग होता. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, माढा, मोहोळ आदी तालुक्यांना उपयोग होतो. उजनी धरण झाल्याने लाभक्षेत्र भागात शेतकरी जादा पाण्याची पिके घेऊ लागली. याबरोबर फळबागाचे क्षेत्र वाढले. आता केळीचे क्षेत्र सुद्धा मोठ्याप्रमाणात वाढत आहे तेही उजनीच्या पाण्यामुळे. कारण सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमी पडत असला तरी पुणे जिल्ह्यात होणाऱ्या पावसामुळे भिमा नदीला पाणी येते आणि उजनी धरण भरते. उजनी धरण भरल्यानंतर या धरणातून वाया जाणाऱ्या पाण्याने इतर तलाव आणि बंधारे सुद्धा भरुन घेतले जातात. त्यामुळे उन्हाळ्यातही पाण्याची टंचाई निर्माण होत नाही. शेती, उद्योग आणि नागरिकांना पिण्यासाठी पाणी अशा तीन कारणासाठी हे पाणी वापरले जात आहे. मात्र, उजनी धरण झाल्यानंतर कालव्याने काही भागात पाणी जात होते. त्याच्यापेक्षा उजनीजवळ असलेल्या शेतकऱ्यांना पाणी घेण्यास अडचणी येत होत्या. विजेचा प्रश्‍न खूप गंभीर होता. त्यामुळे पाणी असून सुद्धा उपयोग नव्हता तर शेतकरी, उद्योग समृद्ध करायचे असतील तर वीज आवश्‍यक आहे. यासाठी स्थानिक नेते पुढाकार घेत होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारचा कृषीभुषण पुरस्कार मिळालेले आनंद कोठडीया यांनी शरद पवार यांना वीजेच्या प्रश्‍नात लक्ष घालण्याची पत्राद्‌वारे मागणी केली होती. याचीही दखल शरद पवार यांनी घेतली होती.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्यानंतर विजेची माहिती घेऊन पवार यांनी आनंद कोठडीया यांना पत्राद्‌वारे पाठपुरावा करत असल्याचे व विद्युत मंडळ काय करत आहे हे सांगितले होते. हे पत्र कोठडीया यांच्याकडे आहे. 
ग्रामीण विकास संशोधन संस्थेचे आनंद कोठडीया यांनी शरद पवार यांना जिल्ह्यातील वीज प्रश्‍नाबात लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी उजनी धरण झाले मात्र, शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळत नसल्याने पाणी वापरता येत नाही, असं पवार यांच्या निदर्शनास आणून दिले होते. याशीवाय इतरही मागण्या त्यांनी पवार यांच्याकडे केल्या होत्या. या पत्राला शरद पवार यांनी १४ मे १९८८ रोजी पत्र पाठवून उत्तर दिले होते. त्या पत्रात पवार यांनी म्हटले आहे की, ‘सोलापूर जिल्ह्यातील विद्युतीकरण व विद्युत पुरवठ्याबाबतची माहिती मी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून माहिती मागविली आहे. त्यांनी पाठवलेली माहिती नकाशासह आपल्याला माहितीसाठी पाठवत आहे.’  या पत्रासोबत तीन पानाची माहिती असून एक नकाशा पाठवला आहे. यामध्ये जिल्ह्यात किती ट्रान्सफार्म आहेत. विजेचा प्रश्‍न सोडवण्यासाठी काय केले जात आहे, कशा प्रकारे विद्युत वाहीन्या टाकल्या जात आहेत. याची माहिती आहे. सोलापूर जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यात कोठून विद्युत पुरवठा जाणार आहे याची माहिती दिली आहे.

आनंद कोठडीया म्हणाले, उजनी धरण झाल्यानंतर वीजेचा प्रश्‍न गंभीर होता. शेतकऱ्यांचे विद्युतपंप जळत होते. त्याकडे विद्युत मंडळाचे अधिकारी गाभीर्यांने पाहत नव्हते. विद्युत मंडळाची वितरण व्यवस्था नव्हती. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. यामुळे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सर्व पक्षाच्या नेत्याने आंदोलन केले. तेव्हा मदत करेल तोच नेता होता. तेव्हा शरद पवारांनी आंदोलनकर्त्यांसाठी खास वेळ दिली आणि गांभीर्याने लक्ष घातले. तेव्हा राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व दिले जात होते. करमाळ्यातील अनेक कार्यकर्ते व नेते सामाजिक प्रश्‍नासाठी एकत्र येत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar pays attention to solve the problem of electricity in Solapur district