Photo : किमया निसर्गाची... छबी शिवबाची... आसमंतात साकारली शिवप्रतिमा

श्रीकांत मेलगे
Wednesday, 19 February 2020

आकाशात ढग व सूर्य यातून साकारलेली शिवप्रतिमा याचे छायाचित्र मरवडे येथील डॉ. विवेक निकम यांनी मंगळवेढा बस स्थानक परिसरात टिपले आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आसमंतात महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची छबी सकारल्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात 'किमया निसर्गाची... छबी शिवबाची...' असे म्हणत शिवप्रेमीकडून ही शिवबांची छबी व्हरायल झाली आहे.

मरवडे (सोलापूर) : महाराष्ट्रभर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठया उत्साहात साजरी होत असताना निसर्गानेही आकाशात ढग व सूर्य यातून शिवप्रतिमा साकारत महाराष्ट्राच्या राजांची प्रेरणा प्रत्येक माणसांच्या मनाबरोबर निसर्गाच्या ठायींही असल्याचे दाखवून दिले.

मंगळवेढा येथील बसस्थानक परिसरात आकाशात उमटलेली छत्रपती शिवाजी महाराज हीच ती छबी, टिपली आहे मरवडे येथील डॉ. विवेक निकम यांनी.

आकाशात ढग व सूर्य यातून साकारलेली शिवप्रतिमा याचे छायाचित्र मरवडे येथील डॉ. विवेक निकम यांनी मंगळवेढा बस स्थानक परिसरात टिपले आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आसमंतात महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची छबी सकारल्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात 'किमया निसर्गाची... छबी शिवबाची...' असे म्हणत शिवप्रेमीकडून ही शिवबांची छबी व्हरायल झाली आहे.
चराचरात शिवबा,
मनामनात शिवबा!! 
मातीच्या प्रत्येक कणाकणात शिवबा, 
आसमंतातील प्रत्येक रंगात शिवबा.
जर असेल आपल्या हृदयातच शिवबा, तर नक्की दिसे ह्या नभात ही शिवबा.

जय भवानी.. जय शिवाजी... असा मजकुर या फोटोबरोबर शेअर केला जात आहे.
वैद्यकीय व्यवसायात सेवा बजावत असताना फोटोग्राफीचा छंदही जोपासला आहे. मंगळवेढा बसस्थानक परिसरात आकाशातील शिवबांची छबी टिपण्याचा योग जुळून आला. या छायाचित्रास महाराष्ट्रातील शिवप्रेमीकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे, असे डॉ. विवेक निकम म्हणाले.

Image may contain: sky, cloud, outdoor and nature

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiva statue made in the sky