आगळा-वेगळा उपक्रम ; "शिवराय मनामनात... शिवजयंती घराघरांत'

विजयकुमार सोनवणे
Monday, 17 February 2020

उपक्रमामुळे शिवजयंती पोचेल घराघरांत 
आपल्या चारचाकीमध्ये देवदेवतांच्यामुर्तीबरोबरच शिवमुर्ती असणे अभिमानाची गोष्ट असणार आहे. या माध्यमातून "शिवराय मनामनांत... शिवजयंती घराघरांत' पोचण्यास निश्‍चित मदत होईल याचा विश्‍वास आहे. 
- विनोद भोसले, नगरसेवक 

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक विनोद भोसले यांनी "मागेल त्याला शिवमुर्ती' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्याची सुरवात आज शनिवारपासून  होत असून, 19 फेब्रुवारीपर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 1 व्‍यक्ती

"शिवराय मनामनात... शिवजयंती घराघरांत'
"शिवराय मनामनात... शिवजयंती घराघरांत' ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंती आली की सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध संस्था, मंडळे आणि नेतेमंडळींकडून शिवमुर्तींचे मोठ्या प्रमाणात वाटप होते. शहर व जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील मंडळांनाही या शिवमुर्तींचे वाटप होते. सरासरी पाच ते दहा फुटी मुर्तींचे शेकडोंच्या संख्येने वाटप होते. त्याचा उपयोग उत्सव मंडळांना होतो. मात्र प्रत्येकाच्या घरापर्यंत शिवजयंती पोचली पाहिजे, शिवराय मनामनांत रूजले पाहिजेत या हेतूने श्री. भोसले यांनी यंदा आगळा उपक्रम हाती घेतला आहे. सध्या सोलापूर शहरात शिवजयंतीची जय्यत तयारी सुरु झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात सुशोभिकरण करण्यात येत आहे. त्या ठिकाणी विद्युत रोषणाईही केली जाणार आहे. 

चारचाकी वाहनांमध्ये बसविणार मुर्ती 
चारचाकी वाहनांमध्ये चालकाच्या समोरच्या बाजूला देवदेवतांच्या मुर्ती असतात. त्याच धर्तीवर ज्यांना आपल्या चारचाकी वाहनांमध्ये शिवमुर्ती ठेवायची आहे, त्यांना या मुर्ती बसवून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्यांना आपल्या चारचाकीमध्ये शिवमुर्ती बसवून घ्यायची आहे, त्यांनी 9922087037 (प्रविण कदम) किंवा 9011949172 (सौरभ साळुंके) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivajayanti in solapur corporator vinod bhosle