Shivjayanti 2020 : मुस्लिम महिलांनी केला शिवरायांचा जयजयकार 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

सोलापूर : सीएए, एनपीआर व एनआरसी हटाव या मागणीसाठी सोलापुरात संविधान बचाव कृती समितीच्या वतीने मागील 19 दिवसांपासून पूनम गेट जिल्हाधिकारी कार्यालयसमोर मोठ्या संख्येने महिलांचे धरणे आंदोलन सुरू आहे. आज बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सफूर्तपणे साजरी करण्यात आली. आंदोलनस्थळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महिला प्रतिनिधींच्या वतीने पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी हजारोंच्या संख्येने महिलांनी उत्फूर्तपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. 

Image may contain: 4 people, people standing

नागरिकांत कौतुकाचा विषय 
छत्रपती शिवाजीराजे हे हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असून त्यांचे विचार देशाची राष्ट्रीय एकता अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्व बहुजन समाजात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करण्याचा मनोदय संयोजक 
महिलांनी व्यक्त केला. बहुसंख्येने मुस्लिम महिलांनी शिवजयंती साजरी करताना पाहून नागरिकांत हा विषय कौतुकाचा ठरला. 

हेही वाच - Shivjayanti 2020 : सोलापुरातील कोणत्या मंडळाचा काय कार्यक्रम वाचा (Video) 

शिबिरात 224 जणांचे रक्तदान 
मुस्लिम समाज भगिनी आणि बांधवांतर्फे शिवजन्मोत्सवनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात 224 रक्तदात्यांनी रक्तदान केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत अनेक मुस्लिम सरदारांनी योगदान दिले. अनेक महत्त्वाच्या कामगिरीत मुस्लिम सैन्यांनी आपले रक्त वाहिले. स्वराज्यात धर्म वा जातिभेदाला थारा नव्हता, कुराण हा अस्मानी ग्रंथ असून त्याचा आदर राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हा संदेश त्यांनी सैनिकांना दिलेला होता. आजच्या पिढीला हा सामाजिक समतेचा वारसा कळण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे, असे मत मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांनी व्यक्त केले. 

Image may contain: one or more people, crowd and outdoor

मान्यवरांची उपस्थिती 
एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनातील भगिनीनींही या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला होता. शिबिरात 224 जणांनी रक्तदान केले. याप्रसंगी नगरसेवक तौफिक हत्तुरे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा निर्मला शेळवणे, कार्याध्यक्षा मनीषा नलावडे, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्‍याम कदम, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड जिल्हाध्यक्ष फारूख शेख, शहराध्यक्ष माजी मतीन शेख, गुरफान इनामदार, खालिक मन्सूर, अशपाक बागवान, अल्ताफ लिंबूवाले आदी उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivjayanti 2020 : Muslim women praise Shivrai