धक्कादायक बातमी ! 'मातोश्री'वरील पोलिसांच्या संपर्कातूनच सोलापुरचे 'एसआरपीएफ'चे 28 जवान कोरोना पॉझिटिव्ह

तात्या लांडगे
गुरुवार, 21 मे 2020

समादेशक रामचंद्र केंडे म्हणाले...

  • 'मोतोश्री'वरील जिल्हा पोलिसांच्या संपर्कातून एसआरपीएफ जवानांना झाली कोरोनाची बाधा; ट्रॅव्हल हिस्ट्रीतून उघड झाली माहिती
  • 26 एप्रिलला मातोश्रीवर बंदोबस्तासाठी गेलेल्या तुकडीतील आतपर्यंत 28 जवानांना झाला कोरोना; 13 जवानांची कोरोनावर मात
  • 'एफ' या एसआरपीएफच्या तुकडीतील पूर्वीचे 13 कोरोनाबाधित जवान ठणठणीत; आता नव्याने 15 जवान बाधित
  • कोरोनाबाधित जवानांच्या संपर्कातील 48 जवान सध्या विलगीकरण कक्षात दाखल; तर 27 जण हेड कॉर्टरमध्ये क्वारंटाईन
  • 45 दिवसांच्या बंदोबस्तासाठी गेलेली 'एफ' तुकडीतील जवान कोरोनामुळे विलगीकरण कक्षात; 20 दिवसांनंतर तुकडी परतणार

सोलापूर : राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी 45 दिवसांच्या बंदोबस्तासाठी 26 एप्रिलला सोलापुरातून एसआरपीएफची तुकडी मुंबईला गेली. त्यानंतर ड्यूटी करताना तेथे पूर्वीपासून असलेल्या जिल्हा पोलिसांच्या संपर्कातून या तुकडीतील 13 जवानांना कोरोना झाल्याचे ट्रॅव्हल हिस्ट्रीतून समोर आले आहे. त्यांच्या संपर्कातील 15 जवानही आता कोरोनाबाधित निघाले. पूर्वीचे 13 जवान आता बरे झाले असून या 15 जवानांवर कलाना येथे उपचार सुरु आहेत.

मातोश्रीवरील बंदोबस्तासाठी सोलापुरातून एसआरपीएफची एक तुकडी मागवण्यात आली. त्यानुसार 90 जवानांची एक तुकडी 26 एप्रिल रोजी मुंबईला पोहोचली. त्याठिकाणी पूर्वीपासून बंदोबस्ताला असलेल्या जिल्हा पोलिसांच्या संपर्कात या तुकडीतील काही जवान आले. जिल्हा पोलिस खात्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर या जवानांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये एसआरपीएफच्या तुकडीतील 13 जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. या जवानांच्या संपर्कातील 50 जणांची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यातील 15 जवान कोरोनाबाधित असल्याचे आढळले. त्यांच्यावर उपचार सुरु असून दोन-तीन दिवसांत त्यांना सोडण्यात येईल, अशी माहिती सोलापुरातील एसआरपीएफ कॅम्पचे समादेशक रामचंद्र केंडे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking news 28 SRPF jawans of Solapur tested positive for corona through police contact on Matoshri