धक्कादायक..! 'एनटीपीसी'चे 17 वीज वाहक टॉवर कापले 

Shocking NTPCs 17 power carrier towers cut off
Shocking NTPCs 17 power carrier towers cut off

पंढरपूर (जि. सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील देगाव, गुरसाळे, आढीव, चिलाईवाडी, नेमतवाडी हद्दीतील एनटीपीसी प्रकल्पाचे सुमारे 17 वीज वाहक टॉवर अज्ञांनी कापल्याची धक्कादायक बाब आज सकाळी समोर आली आहे. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना मध्यरात्री घडली असावी असा अंदाज आहे. 
टॉवर उभारणीसाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीला बाजार भावाच्या चारपट मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करून ही दखल घेतली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी उद्विग्न होऊन हे कृत्य केले असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील एनटीपीसी वीज प्रकल्पातून उजनी धरणाच्या पॉवर हाउससाठी वीज पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. यासाठी दक्षिण सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर आणि माढा या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात सुमारे 100 फूट उंचीचे टॉवर उभे केले आहेत. संबंधित शेतकऱ्यांना 1 लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. परंतु, ही नुकसान भरपाई अपुरी असून बाजार भावाच्या चौपट रक्कम मिळावी, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी या भागातील शेतकऱ्यांनी एनटीपीसीच्या विरोधात उपोषण देखील केले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासन दिले होते. त्यानंतर ही शेतकऱ्यांना अपेक्षीत मोबदला मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. 
त्यातच आता पंढरपूर तालुक्‍यात उभारण्यात आलेले जवळपास 15 ते 17 टॉवर कट केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एनटीपीसीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com