सोलापुरातही श्री गणेशोत्सव होणार साधेपणाने साजरा 

विजयकुमार सोनवणे /श्रीनिवास दुध्याल
शुक्रवार, 22 मे 2020

उत्सवावर होणारा खर्च हा गरिबांना अन्नदान करणे, मिरवणुका न काढणे आदींबाबत कार्यकर्त्यांशी बोलून आढावा घेतला जात आहे. त्यावर लवकरच अंतिम निर्णय होणार असून त्यानुसार उत्सव साजरा केला जाणार आहे. 

सोलापूर : कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा श्री गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत शहरातील मध्यवर्ती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांत चर्चा सुरू आहे. मंडळाच्या विश्‍वस्त समित्यांच्या बैठकीत त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. 

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणपतींसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर सोलापुरातील मध्यवर्ती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत चर्चा सुरू केली आहे. उत्सवावर होणारा खर्च हा गरिबांना अन्नदान करणे, मिरवणुका न काढणे आदींबाबत कार्यकर्त्यांशी बोलून आढावा घेतला जात आहे. त्यावर लवकरच अंतिम निर्णय होणार असून त्यानुसार उत्सव साजरा केला जाणार आहे. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 1 व्‍यक्ती, जवळून
प्रताप चव्हाण, अध्यक्ष 
सोलापूर शहर मुख्य मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 

अत्यंत साधेपणाने साजरा करणार उत्सव 
यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याबाबत सोलापूर शहरातील मुख्य मध्यवर्ती मंडळातर्फे आवाहन करण्यात येणार आहे. उत्सवावर होणारा खर्च हा गरिबांचे पुनरुज्जीवन करणे, शासनाला मदत करणे तसेच जीवाची बाजी लावून कोरोनाच्या विरोधात मैदानात उतरलेल्यांचा सन्मान करणे आदींचे नियोजन प्रस्तावित आहे. मानाच्या "श्रीं'च्या मूर्तीची मिरवणूक कशी काढायची याबाबत विश्‍वस्त समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. 
 प्रताप चव्हाण, अध्यक्ष 
सोलापूर शहर मुख्य मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 


श्रीकांत घाडगे, सल्लागार 
लोकमान्य संयुक्त मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 

विश्‍वस्त समितीच्या बैठकीत होणार निर्णय
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव हा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत नियोजन सुरू आहे. उत्सवानिमित्त जमा होणाऱ्या देणगीतून समाजातील गरजूंना मदत करणे, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देणे, शैक्षणिक शुल्क भरणे तसेच शासनाच्या आवाहनानुसार कार्यवाही करणे याबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच विश्‍वस्त समितीची बैठक होईल व अंतिम निर्णय होईल. 
- श्रीकांत घाडगे, सल्लागार 
लोकमान्य संयुक्त मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 


देवेंद्र भंडारे, संस्थापक 
लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ 

प्रमुख पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक 
यंदाचा श्री गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करण्यात येणार आहे. त्याचे स्वरूप कसे असावे याबाबत चर्चा करण्यासाठी आमच्या मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, विश्‍वस्त समितीच्या सदस्यांची लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत भविष्यातील स्थितीचा अंदाज घेऊन उत्सवाबाबतचे धोरण ठरविण्यात येईल व नियोजन केले जाईल. 
- देवेंद्र भंडारे, संस्थापक 
लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: Vijay Gaikwad, सेल्फि आणि जवळून
विठ्ठल कोटा, सल्लागार,
​विडी घरकुल मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ 

गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने
विडी घरकुल ही कामगार व कष्टकऱ्यांची वसाहत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव हा लोकवर्गणीतून साजरा केला जातो. येथे बेरोजगारीमुळे व पगार नसल्याने अनेक कुटुंबांची उपासमार सुरू आहे. मग वर्गणी कशी जमा होणार. त्यामुळे या वर्षी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत विविध मंडळांत चर्चा सुरू आहे. त्याबाबत मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय होईल. 
- विठ्ठल कोटा, सल्लागार,
विडी घरकुल मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ 
 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: Gurushant Dhuttargaonkar, दाढी आणि जवळून
निरंजन बोद्धूल, अध्यक्ष,
​पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ 

 

रक्कम गरजवंतांना
लॉकडाउनमुळे पूर्वभागातील विडी व यंत्रमाग कामगार बेरोजगार झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे अनेक मंडळे कंटेन्मेंट झोनमध्ये अडकली आहेत. गणेशोत्सवाला तीन महिन्यांचा अवधी राहिला आहे. कोरोनाचा संसर्ग इतक्‍यात कमी होईल असे वाटत नाही. त्यामुळे या वर्षी पूर्वभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळातर्फे इतर मंडळांना गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे व जमा झालेल्या वर्गणीतून आरास-देखावे सादर न करता ती रक्कम गरजवंतांना धान्य वाटप करण्याबाबत आवाहन करणार आहे. 
- निरंजन बोद्धूल, अध्यक्ष,
पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ 


विजय शाबादी, संस्थापक, विजयपूर रस्ता गणेशोत्सव मंडळ 

सार्वजनिक उत्सव बंद करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील सार्वजनिक उत्सव बंद करून प्रत्येक सण हा घरात साजरा करण्याबाबत राष्ट्रव्यापी निर्णय घ्यावा, असे पत्र विजयपूर रस्ता मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय शाबादी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवले आहे. महाराष्ट्रात लवकरच गणेशोत्सव येत आहे. यंदाच्या उत्सवावर कोरोनाचे सावट असणार आहे. हा सार्वजनिक उत्सव रस्त्यावर साजरा केला जातो. मोठमोठ्या मंडपांसाठी खड्डे मारले जातात. पर्यावरणाचा ऱ्हास होतो. ध्वनिप्रदूषण होते. लोकांना अडचण होते. इतरही काही उत्सव रस्त्यावर साजरे होतात. यंदा कोरोनामुळे देशातील सर्व सार्वजनिक उत्सव बंद करावेत व ज्या त्या समाजाने आपले उत्सव घरी आनंदाने साजरे करावेत, असे आवाहन करण्यात यावे, असेही या पत्रात म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Ganeshotsav will also be celebrated in Solapur with simplicity