esakal | लढायांपलीकडले शिवाजी महाराजसुद्धा लोकांना कळले पाहिजेत : श्रीमंत कोकाटे 

बोलून बातमी शोधा

Shivaji Maharaj}

श्रीमंत कोकाटे पुढे म्हणाले, की फक्त अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची फजिती, आग्य्राहून सुटका म्हणजेच शिवचरित्र नव्हे. शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण, विज्ञानवादी दृष्टिकोन, सामाजिक समानता ही त्यांची कार्येही महत्त्वाची आहेत. 

लढायांपलीकडले शिवाजी महाराजसुद्धा लोकांना कळले पाहिजेत : श्रीमंत कोकाटे 
sakal_logo
By
गंगाधर पोळ

चिखलठाण (सोलापूर) : लढायांपलीकडले शिवाजी महाराज सुद्धा लोकांना कळले पाहिजेत आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी शेटफळ (ता. करमाळा) येथे केले. शिवजयंती निमित्त मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ, शेटफळ (ता. करमाळा) यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात शिवरायांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

श्रीमंत कोकाटे पुढे म्हणाले, की फक्त अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची फजिती, आग्य्राहून सुटका म्हणजेच शिवचरित्र नव्हे. शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण, विज्ञानवादी दृष्टिकोन, सामाजिक समानता ही त्यांची कार्येही महत्त्वाची आहेत. शिवरायांच्या काळात स्त्रियांना पूर्ण संरक्षण होते. महिलांचा आदर केला जात होता. शिवरायांची लढाई ही हिंदू - मुस्लिम लढाई नव्हती. रामदास महाराज शिवरायांचे गुरू कधीच होऊ शकत नाहीत. आई जिजाऊंमुळे त्यांना मुळात बाह्य गुरूची गरजच नव्हती. दुर्दैवाने आजपर्यंत शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहासच लोकांपर्यंत पोचवला गेला. खरा इतिहास समाजापर्यंत पोचवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

ते पुढे म्हणाले, महिलांमध्ये व्रतवैकल्ये, उपवास - तपास यामुळे स्त्रियांचे आरोग्य धोक्‍यात आले असून, त्यांच्यात अंधश्रद्धा वाढत आहेत. स्फूर्तिदायी व प्रेरणादायी इतिहास घडण्यासाठी घराघरात जिजाऊ, अहिल्यादेवी तयार होण्याची नितांत गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यम सूर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमाला सरपंच विकास गुंड, आनंद नाईकनवरे, शिवाजी पोळ, पांडुरंग लबडे, काकासाहेब गुंड, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष नितीन खटके, दीपक पाटील, डॉ. सारंगकर, डॉ. वीर बाळासाहेब झोळ, बाळासाहेब तोरमल, अशोक पोळ, सुहास पोळ, विकास पोळ, नानासाहेब पोळ, राजेंद्र पोळ, गणेश नाईकनवरे, अमित घोगरे, शंकर पोळ, मुरलीधर पोळ, आबासाहेब लबडे, ज्ञानेश्वर पोळ, विशाल पोळ, चेतन पोळ, भाग्यवंत पोळ यांच्यासह ग्रामस्थ व शिवप्रेमी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल