
ठळक बाबी...
सोलापूर : जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये एक हजार 255 व्यक्तींची शनिवारी (ता. 25) टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 154 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या दोन हजार 820 झाली असून मृतांची संख्या आता 75 झाली आहे. शनिवारी मृत्यू झालेल्यांमध्ये अक्कलकोटमधील खासबाग येथील 72 वर्षीय महिला, मैंदर्गीतील 80 पुरुषाचा मृत्यू झाला आहे. मंगळवेढ्यातील गुंगे गल्लीतील 54 वर्षीय पुरुषाचा तर उत्तर सोलापुरातील पडसाळीतील 76 वर्षीय पुरुषाचा आणि बार्शीतील मुल्ला गल्लीतील 82 वर्षीय पुरुषाचा, तर फुले प्लॉटमधील 55 प्लॉटमधील महिलेचा समावेश आहे.
अक्कलकोटमधील बेडर गल्ली, डबरे गल्ली, किरनळी, मिरजगी, नावदंगी, पानमंगरूळ, सुलेर जवळगे येथे 12 रुग्ण सापडले आहेत. तर करमाळ्यातील नालबंद नगर, सुतार गल्ली, देवीचा माळ, सालसे, शेलगाव (क) येथे नऊ, माढ्यातील कुर्डूवाडी, रिधोरे या गावांमध्ये 15 रुग्ण सापडले आहेत. तसेच माळशिरसमधील फळवणी, गिरवी, मांडवे, नातेपुते, संग्राम नगर, वेळापूर, विझोरी याठिकाणी 13 रुग्ण, मंगळवेढ्यातील सिव्हिल कोर्ट, मुलाणी गल्ली, पोलिस ठाणे येथे नऊ रुग्ण आढळले आहेत. मोहोळमधील आष्टे, कामती बु., खंडाळी व पापरी, शेजबाभूळगाव याठिकाणी सात रुग्णांची भर पडली आहे. उत्तर सोलापुरातील डोणगाव, हिरज, पडसाळी येथे पाच रुग्ण, पंढरपुरातील ज्ञानेश्वर नगर, गांधी रोड, घोंगडे गल्ली, इंदिरा गांधी मार्केट, महावीर नगर, सांगोला रोड, भंडीशेगाव, फुलचिंचोली, मेंढापूर, नारायण चिंचोली येथे 30 रुग्ण आढळले आहेत. तसेच सांगोल्यातील कडलास नाका, बलवडी, महूद, निजामपूर, वझरे या गावांमध्ये सात रुग्णांची भर पडली आहे. दक्षिण सोलापुरातील बंकलगी, धोत्री, हत्तुर, होटगी, कारकल, मंद्रूप, नविन विडी घरकूल येथे 17 रुग्ण, तर बार्शीतील अलीपूर रोड, बालाजी कॉलनी, बारंगुळे प्लॉट, भवानी पेठ, बुरुड गल्ली, धनगर गल्ली, जावळे प्लॉट, कसबा पेठ, लोकमान्य चाळ, मांजरे चाळ, नळे प्लॉट, सोलापूर रोड, तेलगिरणी चौक, पानगाव, रातंजन आणि वांगरवाडी येथे 30 रुग्ण सापडले आहेत.
तालुकानिहाय रुग्णसंख्या