बापरे.. रिक्षात चालकाच्या पायावर साप! काय झाले नेमके? वाचा..

परशुराम कोकणे
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

रिक्षाचालक प्रथमेश यास पायावर काहीतरी हालचाल होत असल्याचे लक्षात आले. पायाकडे पाहिले तर तीन फूट लांबीचा साप दिसला. साप पाहून गोंधळलेल्या प्रथमेशला रिक्षा कशी थांबवावी काही सुचेना झाले.

सोलापूर : सोलापूरहून मोहोळच्या दिशेने निघालेल्या रिक्षात साप निघाला. पायावर काहीतरी हालचाल होत असल्याचे लक्षात येताच चालकाने खाली पाहिले तर तीन फूट लांबीचा साप दिसला. चालकाने लागेच रिक्षा थांबवून सर्परक्षकांना बोलावले. नेचर कॉन्झर्वेशनच्या सदस्यांनी सापाला ताब्यात घेऊन निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.

पहा व्हिडिओ..​

इससे बडा पाइप लानेका है.. असे म्हणून रात्रीतून चोरून नेले पाइप!

पायावर काहीतरी हालचाल
शनिवारी सकाळी नऊ वाजता तरुण रिक्षाचालक प्रथमेश मोटे हा आपल्या रिक्षातून प्रवासी भरून मोहोळच्या दिशेने निघाले होते. बाळे परिसरातील शिवाजीनगरपर्यंत गेल्यानंतर रिक्षाचालक प्रथमेश यास पायावर काहीतरी हालचाल होत असल्याचे लक्षात आले. पायाकडे पाहिले तर तीन फूट लांबीचा साप दिसला. साप पाहून गोंधळलेल्या प्रथमेशला रिक्षा कशी थांबवावी काही सुचेना झाले. चालू रिक्षात चालकाच्या पायावर साप आल्याने प्रवासी घाबरले. 

Image may contain: one or more people and outdoor

परदेशी सायकलस्वारांची सुटका! काय झाले नेमके? वाचा..

सर्परक्षक घटनास्थळी पोचले
प्रथमेशने धाडस करून रस्त्याच्या कडेला रिक्षा थांबवली. चालक आणि सर्व प्रवासी रिक्षातून बाहेर आले आणि रिक्षाकडे पाहू लागले. साप ब्रेकपासून इंजिनच्या मागे जाऊन बसला होता. प्रथमेशने प्रसंगावधान राखून सर्परक्षक सागर धाकपाडे आणि सुरेश क्षीरसागर यांना सापाची माहिती दिली. दोघेही काही वेळात घटनास्थळी पोचले. इंजिनच्या बूुाला साधारण तीन फूट लांबीचा बिनविषारी तस्कर जातीचा साप दिसून आला. 

Image may contain: one or more people

प्लास्टिक बरणी मागवली
रिक्षा महामार्गावर असल्याने त्या सापाला ताब्यात घेण्यासाठी सुरेश यांनी शिवाजीनगर येथील सुनीता माने त्यांच्याकडून प्लास्टिक बरणी मागवली. रिक्षा एका बाजूला वाकवून सुरेश हे रिक्षाच्या खाली गेले. अगदी अलगदपणे तस्कर जातीच्या बिनविषारी सापाला बाहेर काढून त्याला प्लास्टिक बरणीत बंद केले. रिक्षाचालक आणि प्रवाशांना सापाची प्राथमिक माहिती दिली. त्यानंतर सर्परक्षकांनी जवळच निसर्गाच्या सानिध्यात त्याला सोडून दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snake in auto rickshaw