सावधान! तर पेटीएममध्ये पैसे भरू नका

So do not pay in Paytm
So do not pay in Paytm

सोलापूर : सावधान! पेटीएम वापरत असला तर काळजी घ्या. कारण पेटीएम सुरू ठेवण्यासाठी पैसे भरण्याबाबत सोलापुरातही काहीजणांना एसएमएस आले आहेत. त्यामुळे पैसे भरायचे की नाही, असा संभ्रम वापरकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. काही दिवसांपासून पेटीएम बंद होणार असे मेसेज व्हायरल होत आहेत. पेटीएम सुरू ठेवण्यासाठी ठराविक रक्कम भरण्याबाबत आवाहन केले जात आहे. मात्र, त्यातून फसवणूक होत असल्याची चर्चा आहे. 
सध्या अनेक आर्थिक व्यवहार ऑनलाइन केले जात आहेत. नेट बॅंकिंगप्रमाणेच पेटीएमचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मोठमोठ्या मॉलपासून पान टपरी, चहाच्या टपरीवर देखील मोठ्याप्रमाणात वापरण्यात येत असलेले पेटीएम सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यामुळे अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत अधिकृत माहिती समजलेली नाही. मात्र, पैसे भरायचे की नाही, असा प्रश्‍न वापरकर्त्यांच्या मनात आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका वापरकर्त्यांला आलेल्या मेसेजमध्ये म्हटले की, तुमचे पेटीएम 24 तासांत बंद होईल. पेटीएम सुरू ठेवण्यासाठी ऍप डाऊनलोड करा, असे सांगितले जात आहे. दुसऱ्या एकालाही असाच मॅसेज आला असून 9 तारखेपर्यंत पैसे भरा, असे म्हटले आहे. 


पेटीएम बंद पडणार असे मेसेज फिरत आहेत. मात्र यामध्ये तथ्य नाही. या सर्व अपवा आहेत. जोपर्यंत पेटीएम स्वत: याबाबत जाहीर करत नाही. तो पर्यंत त्यावर विश्‍वास ठेऊ नये. 
- मंजुनाथ ककळमेली, सायबर तज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com