सोलापुरात रात्रीत वाढले 26 रुग्ण, एकूण कोरोना बाधित 891

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

सोलापुरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या वाढत असताना सोलापुरातील कोरोना आटोक्यात येणार कसा ? याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोलापुरातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या हजाराच्या जवळ तर मृत व्यक्तींची संख्या शंभराच्या जवळ पोहोचू लागली आहे. अवघ्या दोन महिन्यात सोलापूर हाताबाहेर गेल्याने चिंता व्यक्त होत आहे.

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात रात्रीत 26 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून सोलापुरातील कोरोनाबाधित व्यक्तींची एकूण संख्या 891 झाली आहे. शनिवारी सायंकाळी साडेसात ते रविवारी सकाळी आठ या साडेबारा तासात 13 पुरुष आणि 13 महिलांची भर पडली आहे. 
आज सकाळी आठ वाजेपर्यंत एका पुरूषाचा मृत्यू झाल्याने सोलापुरात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 84 झाली आहे. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 380 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 79 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 26 अहवाल पॉझिटिव्ह तर 53 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत 7 हजार 115 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून सहा हजार 224 निगेटिव्ह आले आहेत. 891 पॉझिटिव्ह आले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Solapur, 26 patients were raised overnight, with a total of 891 corona infections Open