सोलापुरात एकाच दिवशी आढळले 84 कोरोना बाधित, पाच जणांचा मृत्यू, बाधितांची संख्या 949

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

आज एका दिवसात पाच जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे आतापर्यंत मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 88 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली.

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात आज तब्बल 84 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने सोलापुरातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 949 झाली आहे. आज एका दिवसात पाच जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे आतापर्यंत मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 88 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली. कोरोना चाचणीचे अद्यापही 581 रिपोर्ट प्रलंबित आहेत. 
कोरोना मुक्त झालेल्या 14 जणांना आज घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत सोलापुरातील 394 जण कोरोना मुक्त झाले आहेत. थोबडे वस्ती नीलम नगर परिसरातील 70 वर्षिय  पुरुषाला 19 मे रोजी रात्री बाराच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले. 30 मे रोजी सायंकाळी सात वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. बुधवार परिसरातील 78 वर्षीय महिलेला 28 मे रोजी दुपारी बारा वाजता उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान 31 मे रोजी सकाळी साडेसात वाजता त्यांचे निधन झाले. रविवार पेठ परिसरातील 72 वर्षीय पुरुषाला 26 मे रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले. 31 मे रोजी दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. भवानी पेठ घोंगडे वस्ती परिसरातील 74 वर्षीय महिलेला 26 मे रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले. 31 मे रोजी दुपारी साडेतीन वाजता त्यांचे निधन झाले. निराळे वस्ती परिसरातील 79 वर्षीय पुरुषाला 29 मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 31 मे रोजी सकाळी साडेसात वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 
आज नव्याने आढळलेल्या 84 कोरोनाबाधित व्यक्तीमध्ये शास्त्री नगर परिसरातील एक पुरुष व  एक महिला, गुलाभाई चौक येथील दोन पुरुष व  दोन महिला, मुळेगाव रोडवरील राघवेंद्र नगर मधील चार पुरुष व तीन महिला,  बुधवार पेठेतील तीन पुरुष व एक महिला,  भारतरत्न इंदिरा नगर येथील एक पुरुष, रविवार पेठेतील एक पुरुष, केशवनगर पोलीस वसाहत येथील एक पुरुष, झोपडपट्टी क्रमांक दोन विजापूर रोड येथील एक महिला, निराळे वस्ती येथील एक पुरुष, इंदिरानगर येथील एक महिला, विनायक नगर येथील एक महिला, भवानी पेठेतील एक पुरुष, बाळे शिवाजीनगर येथील दोन महिला, बादशा पेठेतील एक महिला, जुळे सोलापुरातील शिवगंगा नगर येथील एक पुरुष, गीता नगर येथील एक पुरुष, न्यू बुधवार पेठ येथील एक महिला, आरटीओ ऑफिस परिसरातील एक महिला, शिवगंगा नगर शेळगी येथील दोन महिला, भवानी पेठेतील सोना नगर येथील एक महिला, सम्राट चौकातील एक पुरुष, पुना पुना नाका येथील एक पुरुष, विडी घरकुल येथील एक पुरुष व चार महिला, समाधान नगर येथील एक पुरुष व  एक महिला, कुर्बान हुसेन नगरीतील एक पुरुष व  एक महिला, दक्षिण सदर बझार येथील एक पुरुष, साखर पेठेतील दोन पुरुष व चार महिला,  सलगर वस्ती येथील तीन पुरुष व दोन महिला, सातरस्ता येथील दोन पुरुष व  दोन महिला, न्यू पाच्छा पेठ येथील एक महिला, एमाआयडीसी नीलम नगर येथील एक पुरुष व  दोन महिला, सात रस्ता बिग बझार येथील दोन पुरुष व दोन महिला, साईबाबा चौकातील तीन पुरुष व एक महिला, अक्कलकोट येथील मधला मारुती परिसरातील दोन पुरुष, अक्कलकोट मधील उत्कर्ष नगर येथील एक महिला, अक्कलकोट मधील संजयनगर येथील एक पुरुष, बार्शी तालुक्यातील जामगाव येथील एक महिला, बार्शी तालुक्यातील शेंद्री येथील दोन पुरुष व दोन महिला, बार्शी तालुक्यातील रातंजन येथील एक महिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Solapur, 84 corona bites were found on the same day, killing five people and injuring 949