अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सोलापुरात तरुणाच्या मृत्यूची तक्रार (VIDEO)

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सोलापुरात तरुणाच्या मृत्यूची तक्रार (VIDEO)

सोलापूर : कोरोनावर मात करण्यासाठी नियुक्त यंत्रणेतील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे तरुण भावाचा मृत्यू झाल्याची तक्रार विजापूर नाका परिसरातील सुरज 
बुरुगवार या युवकाने केली आहे. आकाश तिरुपती बुरुगवार (वय-26, रा. विजापूर नाका झोपडपट्टी) हे मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. 


जिल्हाधिकारी कार्यालयापासून महापालिका आरोग्याधिकारी ते खासगी रुग्णालयातील डॅाक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला असून, सुमारे 13 मिनिटांचा स्वतःचा व्हिडीओ त्याने व्हायरल केला आहे. त्यामुळे संबंधिताचा भाऊ आजारी पडल्यापासून ते त्याचा मृत्यू होईपर्यंतच्या घटनाक्रम विशद केला आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या टोल फ्रीचा समाचार घेताना संबंधित युवकाने टोल फ्री, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका रोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी पुन्हा जिल्हाधिकारी यांना
संपर्क साधल्यावर कशी टोलवाटोलवी झाली हे पुराव्यासह स्पष्ट केले आहे. टोल फ्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील फोन उचलण्यात आला, पण महापालिका आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॅा. सोडल, डॅा. आडके यांचे फोन बंद असल्याचे नमूद केले आहे. 


आकाशला 23 मे रोजी निमोनियाचा त्रास झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यास खासगी रुग्णालयात नेले. त्यावेळी शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. आम्ही
त्या रुग्णालयात सांगितले की आमच्या भावाला कोरोना नाही, तरीसुद्धा त्यांनी एेकले नाही. त्यामुळे आम्ही शासकीय रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी त्याचे एक्सरे काढले. 
तरीसुद्धा त्यास खासगी रुग्णालयात नेले नाही. त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, त्यावेळी त्यांनी खासगी रुग्णालयातील डाॅक्टरचा  फोन क्रमांक दिला. त्यानंतर आम्ही पुन्हा आकाशला खासगी रुग्णालयात नेले, त्यावेळी त्यास दाखल करून घेण्यात आले. पण त्याच्यावर अपेक्षित उपचार करण्यात आले नाहीत. त्यामुळे भावाचा मृत्यू या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचा ठपका सुरज बुरुगवार यांनी ठेवला आहे.

अधिकाऱ्यांचा प्रतिसाद नाही
या संदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आरोग्याधिकारी डॅा. संतोष नवले यांच्याशी 9422457926 या क्रमांकावर संपर्क साधला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हाच अनुभव डॅा. सोडल आणि डॅा. आडके यांच्यासंदर्भात आला.  

सोलापुरात तरुणाच्या मृत्यूची तक्रार (VIDEO)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com