दोन बसची समोरासमोर धडक सोलापूर जिल्ह्यात एक बस उलटली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

सोलापूर/ लऊळ : सोलापूर जिल्ह्यात कुर्डुवाडी पंढरपूर मार्गावर समोरासमोर दोन बसची धडक होऊन एक बस उलटली आहे. चार वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. रस्त्याचे काम सुर असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघातामध्ये बसमध्ये 10 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शुक्रवारी (ता.31) महिनाअखेर असल्याने शाळा लवकर सुटली होती.

शाळा सुटल्यानंतर मुले आपल्याला घरी बसने निघाले होते. लऊळ बस स्टॅण्डपासून सुमारे अर्ध्या किलोमीटरवर गेल्यानंतर बस उलटली. घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. 
उलटलेली बस ही कुर्डुवाडी वरुन पंढरपूरला चालली होती. लऊळमध्ये बसमधून विद्यार्थी घेऊन पुढे जात असताना अपघात झाला. कुर्डुवाडी स्थानकातून 3.30 वाजता सुटणारी ती बस आहे. लऊळमधून ही बस पंढरपूरकडे जात होती. त्याचवेळी पंढरपूरकडून कुर्डुवाडीकडे येणारी बस व पंढरपूरकडे जाणारी बस यांच्यात धडक झाली. जखमी विद्यार्थ्यांची नावे समजू शकले नाहीत. अपघाताची माहिती समजताच रुग्णवाहीका रवाना झाली. परंतु साडेचार वाजेपर्यंत तिथे रुग्णवाहीका आलेली नव्हती. जखमीं विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी उपस्थित मदत करत होते. बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी अनेकजण मदत करत होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur district was the bus accident