सोलापूर एमआयएमचे नेते फारुक शाब्दी बिहारमध्ये करणार प्रचार 

प्रमोद बोडके
Thursday, 22 October 2020

आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात दुसऱ्या क्रमांकाची मते 
सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत एमआयएमकडून फारूक शाब्दी यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत फारूक शाब्दी यांनी कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. या मतदार संघात शिवसेना व इतर दिग्गज अपक्ष उमेदवारांपेक्षा शाब्दी यांना अधिक मते मिळाली आहेत. 

सोलापूर : बिहार विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बिहार मधील ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीनच्या (एमआयएम) उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूर शहर एमआयएमचे अध्यक्ष फारूक शाब्दी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदोद्दिन ओवेसी यांनी शाब्दी यांच्यावर बिहारमधील किशनगंज भागातील उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे. 

एमआयएमच्यावतीने बिहार विधानसभेच्या मधील 28 ते 29 जागा लढविण्यात येत आहेत. बिहारमध्ये एमआयएमने एसजेडी, बीएसपी, आरएलएसपी यांच्यासोबत आघाडी केली आहे. या आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूर एमआयएमचे शहराध्यक्ष फारूक शादी हे उद्या (शुक्रवार, ता. 23) बिहारला रवाना होणार आहेत. शहराध्यक्ष शाब्दी म्हणाले, एमआयएमने आजपर्यत आपल्यावरची जी जबाबदारी दिली आहे ती प्रामाणिकपणे पूर्ण केली आहे. बिहारमधील उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी माझ्यासाठी महत्वाची आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur MIM leader Farooq Shabdi will campaign in Bihar