BREAKING....! सोलापूर महापालिका बसविणार मोदी स्मशानभूमीत एक कोटीची विद्युत दाहिनी

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 17 जून 2020

माहिती देण्यास टाळाटाळ
सध्याच्या विद्युत दाहिनीत आतापर्यंत किती कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार झाले याची विचारणा विद्युत अभियंता श्री. परदेशी यांना केली. त्यांनी आयडी हॅास्पिटलमध्ये नोंद असते असे सांगितले. त्यानुसार तेथे संपर्क साधला असता अप्रेंटेस परिचारीका यांनी आम्हाला काही माहिती नाही असे सांगत फोन ठेवून दिला. त्यामुळे अंत्यसंस्काराचा आकडा सांगू नये अशी सूचना वरिष्ठांनी दिली आहे, काय असा प्रश्न उपस्थित झाला. 

सोलापूर - महापालिकेच्या मोरे (मोदी) स्मशानभूमीत सुमारे एक कोटी रुपयांची नवीन विद्युत दाहिनी बसविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा काढल्या असून दोन जुलैपर्यंत निविदा भरण्यासाठी मुदत दिली आहे. सध्याची विद्युत दाहिनी सुमारे ३० वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे ती वारंवार बंद पडत आहे. नव्या विद्युत दाहिनीच्या निविदेसाठी ९७ लाख ४० हजार ९०० रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. 

कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मरण पावलेल्यांची संख्येची नोंद आयडी हॅास्पिटलमध्ये नाही. ०२१७-२३२३७०० या क्रमांकावर संपर्क साधला असता माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.

मोदी येथील महापालिकेच्या मोरे हिंदू स्मशानभूमीत विविध जातींचे लोक अंत्यविधीसाठी येतात. परंतु, शहरवासीयांना पुरेशा मूलभूत सुविधा देण्याबाबत अपयशी ठरलेल्या महापालिका पदाधिकारी, प्रशासनाने मात्र स्मशानभूमीच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवते. स्मशानभूमी सुधारणांबाबत तरी राजकारण, हेवेदावे बाजूला ठेवावेत. महापौर आणि महापालिका आयुक्‍तांनी आपल्या कालावधीत किमान स्मशानभूमी सुधारणांकडे लक्ष देण्याची मागणी सोशिक सोलापूर करीत होते. मात्र विद्यमान आयुक्तांनी हे काम मनावर घेतले आणि या कामासाठी निविदा काढल्या. गेवर सुटीमध्ये क्रिकेटचा खेळ रंगतो. 

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून येथील प्रिसिजन उद्योग समूह मोदी स्मशानभूमीची देखभाल व परिसराचा विकास करणार होता; मात्र महापालिकेकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने हा करार काही दिवसांतच संपुष्टात आला. स्मशानभूमीत 1988 मध्ये विद्युत दाहिनी बसविण्यात आली आहे. ही दाहिनी वारंवार बंद पडते. तसेच या दाहिनीवर होणारा विजेचा खर्च अफाट आहे. नागरिकांची मानसिकता नसल्याने बाळे स्मशानभूमीत असलेल्या डिझेल दाहिनीचा वापर अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या दाहिनी गॅसवर सुरू करता येतील का, याबाबत तत्कालीन प्रभारी आयुक्त अजित जाधव यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, त्यांच्या बदलीनंतर ही प्रक्रिया तेथेच थांबली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Municipal Corporation to install electric crimation in Modi