जळकोट ते सोलापूर प्रवासादरम्यान चोरी ! पोलिसांच्या जाळ्यात अशा अडकल्या मुद्देमालासह तीन महिला चोर 

विजय थोरात 
Friday, 22 January 2021

गुन्ह्यातील महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिस संबंधित महिलांच्या घरी गेले असता त्या घर सोडून गेलेल्या होत्या. त्यानंतर तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारामार्फत वेळोवेळी माहिती घेण्यात आली. यादरम्यान, संशयित आरोपी गुन्ह्यातील चोरलेले सोने विकण्यासाठी सराफ बाजार अशोक चौक येथे आलेल्या आहेत, अशी गुप्त बातमी पोलिसांना मिळाली.

सोलापूर : शहरात वाढत्या चोरीच्या घटनांचा पोलिस प्रशासनाकडून तपास करण्यात आला. याच पार्श्‍वभूमीवर सोलापूर येथून लग्न समारंभास गेलेली महिला ही लग्न समारंभातून परत येताना जळकोट (ता. तुळजापूर) येथून मालट्रकने सोलापूर येथे आली. प्रवासादरम्यान चोरट्याने महिलेच्या हातातील प्लास्टिक पिशवीमधील पाकीट चोरून नेली. त्यात 29 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. या घटनेनंतर तीन महिलांना जेडरोड पोलिसांनी अटक केली असून, त्याअनुषंगाने जेलरोड गुन्हे शाखेच्या पथकाकडून गुन्ह्याचा तत्काळ तपास सुरू करण्यात आला. या गुन्ह्यातील महिलांना सर्व संग्रहित केलेले गुन्हेगार महिलांचे फोटो दाखविण्यात आले. त्यामधील एका महिलेचा फोटो त्या महिलांनी ओळखला. त्यानुसार त्या महिलेचा व इतर महिला साथीदारांचा शोध सुरू करण्यात आला. 

गुन्ह्यातील महिलांचा शोध घेण्यासाठी संबंधित महिलांच्या घरी गेले असता त्या घर सोडून गेल्या होत्या. त्यानंतर तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारामार्फत वेळोवेळी माहिती घेण्यात आली. यादरम्यान, सुषमा चव्हाण (वय 25), सुरेखा भोसले (वय 60), शैला पवार (वय 26, सर्व रा. बिस्मिल्ला नगर, मुळेगाव तांडा, बोरामणी गाव, सोलापूर) हे संशयित आरोपी गुन्ह्यातील चोरलेले सोने विकण्यासाठी सराफ बाजार अशोक चौक येथे आलेल्या आहेत, अशी गुप्त बातमी पोलिसांना मिळाली. जेलरोड गुन्हे पथकाने त्या ठिकाणी महिला पोलिसांसोबत जाऊन त्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी चोरीस गेलेली सर्व मालमत्ता हस्तगत केली. 

जेलरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी कामगिरी केली. जेलरोड पोलिस ठाणेकडील दाखल गुन्ह्यातील तीन महिला आरोपींना अटक करून गुन्हा उघड केला. अशा प्रकारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिन्यामध्ये जेलरोड पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक क्षीरसागर व त्यांच्या पथकाने सतत कामगिरी करत चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, मोटारसायकल चोरी असे एकूण 15 गुन्हे उघड करून आरोपींना अटक करून मालमत्ता हस्तगत केली आहे. 

ही कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, सहाय्यक पोलिस आयुक्त कमलाकर ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाडे, पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद, जेलरोड पोलिस ठाणे गुन्हे प्राधिकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, काळे, शरीफ शेख, बाबा फरीद शेख, राहुल दुधाळे, शिवानंद फुलारी, रमेश गवळी, नागेशसिंह चव्हाण, आबाजी सावळे, मल्लिकार्जुन चमके, दादासाहेब सरवदे, विशाल बनसोडे, सारंग लिगाडे, अमृत सुरवसे, श्रीधर काळे, सोमशेखर उडगी, विकी राठोड यांनी पार पाडली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur police arrest three women for stealing gold