कौतुकास्पद.. गुन्ह्याच्या दोषसिद्धीत सोलापूर चौथ्या क्रमांकावर!

कौतुकास्पद.. गुन्ह्याच्या दोषसिद्धीत सोलापूर चौथ्या क्रमांकावर!

सोलापूर : सोलापूर शहरात गुन्हे दाखल होण्याच्या आणि उघडकीस येण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विविध गुन्ह्यांत दोषसिद्धीचे प्रमाण 78.74 टक्के इतके आहे. महाराष्ट्रात गुन्हे दोषसिद्धीत सोलापूरचा चौथा क्रमांक असल्याचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

या विद्यार्थ्यांना पडली सोलापूरच्या संस्कृतीची भुरळ 

1889 गुन्हे आले उघडकीस
पोलिस आयुक्त शिंदे यांनी 2019 वर्षातील गुन्हेविषयक आढावा सादर केला. ते म्हणाले, "सोलापूर शहरात 2018 ला 2284 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 1618 गुन्हे उघडकीस आले होते. उघडकीस आलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण 70. 84 टक्के होते. तर 2019 ला 2487 गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यांपैकी 1889 गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे उघडकीस येण्याच्या प्रमाणात पाच टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 2019ला जुगाराचे 407 गुन्हे दाखल करून 953 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 46 लाख 10 हजार 32 रुपयांचा माल जप्त केला आहे. 

करमाळ्यातील आदिनाथ कारखान्याच्या कामगारांची आत्महत्या

एमपीडीए कायद्यानुसार 11जणांवर कारवाई
2019ला दारूबंदीचे 1378 गुन्हे दाखल करून 1527 आरोपींना अटक करण्यात आली होती. 66 लाख 19 हजार 804 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत 2019 ला 10 लाख 25 हजार 311 रुपयांची वाढ झाली आहे. 2019ला मालाविषयीचे 641 गुन्हे दाखल करण्यात आले. पैकी 179 गुन्हे उघडकीस आले असून एक कोटी 22 लाख 84 हजार 749 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. माल हस्तगत करण्याचे प्रमाण 35.91 टक्के आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मालाविषयीच्या गुन्ह्यांत 116 गुन्ह्यांनी घट झाली आहे. 2019ला 2811 प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. गतवर्षीच्या तुलनेत 489 ने वाढ झाली आहे. एमपीडीए कायद्यानुसार 11जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, असेही आयुक्त शिंदे यांनी यावेळी सांगितले. या वेळी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त अभय डोंगरे, पोलिस निरीक्षक संजय जगताप उपस्थित होते. 

गुन्हे शाखेच्या पथकाने वर्षभरात 106 गुन्हे उघडकीस आणले आहेत. एकूण 69 आरोपींना अटक केली आहे. यात 76 लाख 85 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विविध गुन्ह्यांतील 168 तक्रारदारांना 90 लाख 56 हजार 523 रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. 
- अंकुश शिंदे, 
पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com