सोलापूर ग्रामीणमध्ये 352 नवे कोरोनाबाधित, दहा जणांचा झाला मृत्यू 

corona
corona

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज नव्या 352 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. दहा जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत ग्रामीण भागातील कोरोना चाचणीचे 2 हजार 712 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 2 हजार 363 अहवाल निगेटिव्ह आले असून 352 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

आज एकाच दिवशी 461 जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे त्या व्यक्तींना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 25 हजार चोवीस झाली असून कोरोनामुळे आत्तापर्यंत 679 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या सहा हजार 276 जणांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 18 हजार 69 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना चाचणीचे 89 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. 

आजच्या अहवालात मृत घोषित करण्यात आलेल्या दहा व्यक्तींमध्ये पंढरपुरातील वीरसागर नगर येथील 62 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील लवंगी येथील 74 वर्षिय पुरुष, बार्शी येथील 65 वर्षीय महिला, माळशिरस तालुक्‍यातील माळेवाडी येथील 51 वर्षिय पुरुष, सांगोला तालुक्‍यातील कोळा येथील 70 वर्षिय पुरुष, बार्शी तालुक्‍यातील सासुरे येथील 72 वर्षीय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील जळोली येथील 55 वर्षीय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील कोर्टी येथील 80 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्‍यातील खंडाळी येथील 70 वर्षीय, महिला माढा तालुक्‍यातील कुर्डूवाडी येथील 66 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com