जनता कर्फ्यु - स्मार्ट सोलापूरकर `सात`च्या आत घरात.... (VIDEO)

विजयकुमार सोनवणे
रविवार, 22 मार्च 2020

प्रवासी अडकले
एसटी सेवाही बंद असल्यामुळे मुंबईहून मुरुम आणि बंगळुरूकडे जाणारे प्रवासी एसटी स्थानकावर अडकून पडले होते. त्यांना स्थानकातही बसू दिले जात नसल्यामुळे त्यांची अडचण झाली. एसटी बंद असल्याची माहिती नसल्याने प्रवासाला निघाल्याचे या प्रवाशांनी सांगितले. 

सोलापूर - कोराेना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्मार्ट सोलापूरकरांनी सकाळी सातच्या आत घरात पोचून विषाणूच्या विरुद्ध सुरु झालेल्या युद्धात सक्रीय सहभाग नोंदवला. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: ४ लोक, लोकं उभी आहेत आणि लोकं बसली आहेत
सोलापूर एसटी स्थानकावर अडकलेले प्रवासी 

सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सात रस्ता, रंगभवन चौक, विजापूर वेस, तुळजापूर वेस, नवी पेठ, रेल्वे स्टेशन, एसटी स्थानक ही कायम वर्दळीचे आणि गजबजलेली ठिकाणे. मात्र आज रविवारी पहाटेपासूनच या ठिकाणी निर्मनुष्यता दिसून आली. एखादा हौसी सोलापूरकर वगळता शहरातील प्रमुख रस्त्यांवर गाय, कुत्रे, पशु, पक्ष्यांचे राज्य दिसून आले. ते मुक्तपणे रस्त्यावर संचार करत होते.

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: आकाश आणि बाहेरील
निर्मनुष्य रस्त्यांवर गायींचा मुक्त संचार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील सर्व उद्याने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे येथील प्रसिद्ध होम मैदानावर सकाळी व्यायम करणाऱ्यांची गर्दी गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. मात्र आज पहाटे सहापासूनच हे मैदान जवळपास रिकामेच होते. व्यायामासाठी नियमित येणाऱ्यांनीही सातच्या आत घरी पोचणे पसंत केले. 

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.
सोलापूर रेल्वे स्थानकावरील शुकशुकाट 

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहराच्या विविध भागात फेरफटका मारून स्थितीचा अंदाज घेतला. महत्त्वाच्या चौकात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. अनावश्यक फिरणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. घराबाहेर न फिरण्याची सूचना दिली जात आहे. काही कारण नसताना रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसी हिसका अनुभवता येणार आहे.

चला पाहूयात सोलापूरकरांच्या प्रतिसादाचा  (VIDEO)

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapurcity janta carfew news

टॉपिकस