सोनाईचे अध्यक्ष दशरथ मानेंविरूद्ध करमाळ्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

अण्णा काळे 
Wednesday, 14 October 2020

इंदापूर (जि. पुणे) येथील सोनाई दूध संघाचे अध्यक्ष दशरथ माने यांच्याविरोधात करमाळा येथे ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कर्मउद्यान शाहू कांबळे (रा. सिध्दार्थ नगर, करमाळा) यांनी करमाळा पोलिस फिर्याद दिली आहे.

करमाळा (सोलापूर) : इंदापूर (जि. पुणे) येथील सोनाई दूध संघाचे अध्यक्ष दशरथ माने यांच्याविरोधात करमाळा येथे ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कर्मउद्यान शाहू कांबळे (रा. सिध्दार्थ नगर, करमाळा) यांनी करमाळा पोलिस फिर्याद दिली आहे.
 
करमाळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्याबरोबर मी नेहमीच कामानिमित्त फिरत असतो. त्यामुळे मी गणेश चिवटे यांच्यासोबत अनेक वेळा सोनाई डेअरीच्या कार्यक्रमाला जात असल्याने सोनाईचे अध्यक्ष दशरथ माने मला चांगले ओळखतात. (ता. 11) रोजी मी संदीप काळे हे कुठे आहेत, म्हणून करमाळा येथील भाजप कार्यालयात जाऊन गणेश गोसावी यांच्याकडे चौकशी केली.

तेव्हा संदीप काळे हे एमआयडीसी येथे सोनाई डेअरीच्या उद्‌घाटनाला गेले असल्याचे समजले. मी एमआयडीसीत गेल्यावर रस्त्याच्या बाजूला संदिप काळे यांच्याशी बोलत असताना येथून सोनाई डेअरीचे उद्‌घाटन करून दशरथ माने जात असताना त्यांनी मला जातीवरून शिव्या देऊन, परत इकडे दिसला तर हातपाय मोडीन, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. 

याबाबत दशरथ माने (रा. इंदापूर, जि. पुणे) यांच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. प्रशांत हिरे हे करत आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonai president Dashrath Mane charged with atrocity in Karmala