थेट सीमेवरून स्क्वाड्रन लीडर अमन जैन यांची भावी अभियंत्याना लष्कर सेवेची साद 

aman jain.jpg
aman jain.jpg

द. सोलापूर(सोलापूर)ः "बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकरीच्या स्पर्धेत स्वतःला हरवून घेण्यापेक्षा राष्ट्रहितार्थ सेवा देण्याच्या संधीकडे पहायला पाहिजे. संरक्षण दलात सीमा सुरक्षेसाठी भावी अभियंत्याना मोठी संधी असल्याने त्यांनी याद्वारे राष्ट्रसेवा करावी, असे आवाहन थेट सीमेवरून स्क्वाड्रन लीडर अमन जैन यांनी केले. 

अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर थेट सीमेवरून गुगल मीट माध्यमातून वालचंद इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजीमधील भावी अभियंत्याशी इंडियन एअर फोर्सचे स्क्वाड्रन लीडर अमन जैन यांनी ऑनलाईन संवाद साधला. 

श्री. जैन हे वालचंद अभियांत्रिकीचे 2009 मधील विद्यार्थी आहेत. यावेळी प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे उपस्थित होते. श्री. जैन म्हणाले, "एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी आवश्‍यक असलेल्या सगळ्या गोष्टी या सेवेच्या निमित्ताने मिळतात. कुटुंबियांसाठी आयुष्यभरची वैद्यकीय सेवा, पेन्शन योजना, मुलांच्या शैक्षणिक आणि आरोग्याची जबाबदारी, कॅंटीन फॅसिलिटी, सर्व सुविधांयुक्त निवासस्थान या सगळ्या गरजांबरोबर सामाजिक मान, सन्मान अवर्णनीय आहे. आयटी क्षेत्रातील आकर्षक वेतनाला बळी पडून कायम असुरक्षित राहण्यापेक्षा त्याच तोलामोलाचे वेतन आणि समृद्ध जीवनाची खात्री भारत सरकारकडून या सेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळते. मुलांप्रमाणे मुलींनाही या सेवेसाठी समान संधी आहेत.' यावेळी विद्यार्थ्यांनी संवाद साधत शंकाचे निरसन करवून घेतले. प्रा. विपुल कोंडेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आशा थळंगे यांनी तर आभार मानले. 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com