(Video)... पाहा कशी जळाली सोलापुरात बस!

अशोक मुरुमकर/ सुस्मिता वडतिले
Thursday, 23 January 2020

सोलापूर बस स्थानकात मराठवाड्याकडे जाणाऱ्या गाड्या एका ठिकाणी थांबतात तर पुणे, मुंबई, पंढरपूर, कर्नाटककडे जाणाऱ्या गाड्या वेगळ्या ठिकाणी थांबतात. मराठवाड्याच्या बाजूला जाणाऱ्या बस जिथे थांबतात तेथेच काल रात्री थांबलेल्या गाडीने अचानक पेट घेतला. काही समजण्याच्या आत ती बस जळून खाक झाली.

सोलापूर : सर्वसामान्य प्रवाशांची पसंतीची असलेली लालपरी (एसटी) सध्या आगीच्या खाईत सापडली आहे. ग्रामीण भागात शेवटच्या टोकापर्यंत पोचलेल्या या एसटीचा खिळखिळा झाला आहे. हा प्रकार जुनाच! मात्र, आता तीच बस धगधगते विद्रोह रूप धारण करू लागली आहे. कारण, सोलापूर एसटी बस स्थानकावर उभ्या केलेल्या बसने बुधवारी रात्री अचानक पेट घेतला. यात एसटी महामंडळाचे सुमारे १० ते १२ लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग का लागली? याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र, वेळीच या घटनेकडे गांभीर्याने घेतले नाही तर जीवितहानी होऊ शकेल.

Image may contain: basketball court and outdoor

राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी दीपक साळुंखे-पाटील
सोलापूर बस स्थानकात मराठवाड्याकडे जाणाऱ्या गाड्या एका ठिकाणी थांबतात तर पुणे, मुंबई, पंढरपूर, कर्नाटककडे जाणाऱ्या गाड्या वेगळ्या ठिकाणी थांबतात. मराठवाड्याच्या बाजूला जाणाऱ्या बस जिथे थांबतात तेथेच काल रात्री थांबलेल्या गाडीने अचानक पेट घेतला. काही समजण्याच्या आत ती बस जळून खाक झाली. तिला वाचवण्यात अपयश आले. तिच्याच बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या एका बसलाही तिने आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या बसचेही नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला असलेल्या बसलाही आगीच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. बसमधून धूर येत असल्याचे समजताच तेथील एका प्रवाशाने तत्काळ नियंत्रण कक्षाला कळवले. (तो प्रवासी बाहेरचा होता. त्याचे नाव समजू शकले नाही.) त्यामुळे इतर बस वाचल्या. मात्र, आग लागलेल्या बसने यंत्रणा येईपर्यंत विद्रोही रूप धारण केले होते. ही आग का लागली याचे कारण समलेले नाही. मात्र त्याची चौकशी सुरू आहे. गाडी बसस्थानकात लावल्यानंतर अनेक चालक व वाहक गाडीतच झोपतात. पण अशी रात्री अचानक आग लागली आणि चालक व वाहक जर गाडीत असते तर जीवितहानी झाली असती.

No photo description available.

नीलेश कांबळे, सोलापूर एसटी महामंडळाचे कार्यशाळा सहअधीक्षक : आग लागल्याबरोबर मेकॅनिकल कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहणी केली. मात्र, ती बस जळून खाक झाली. यात एक गाडी जळून खाक झाली तर दुसऱ्या गाड्यांची वाहक बाजू जळून खाक झाली. दीड महिन्यापासून बंद असलेली खराब बॉडी म्हणून तिथे एसटी बस ठेवण्यात आली होती. आग का लागली याची माहिती घेतली जात आहे. कोणीतरी खोडसाळपणा केला आहे का? याचीही चौकशी सुरू आहे. फौजदार चावडी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या आग विझवण्यासाठी आल्या होत्या. एसटीच्या दोन गाड्यांचे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. उभ्या अवस्थेत गाडीला आग लागणे यामुळे संशय वाढत आहे. तिथे दारूच्या बाटल्याही अढळून आल्या आहेत. लवकरच आम्ही आग का लागली याच्या निष्कर्षापर्यंत पोचू. पुन्हा अशी आग लागू नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे. सर्व गाड्यांमध्ये अग्निरोधक सिलिंडर आहेत. नवीन चालक आहेत. त्यांना अग्निरोधक सिलिंडरचे प्रशिक्षण दिले जाते. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेतली जात आहे.

No photo description available.

गाड्यांची स्थिती
सोलापूर बसस्थानकात बुधवारी रात्री अचानक बसने पेट घेतला. त्यात सुमारे १० लाखाचे नुकसान झाले आहे. 

या आगाशीवाय गाडीची स्थिती भयाण आहे. 

No photo description available.

अनेक गाड्यांमध्ये अग्निरोधक फक्त नावाला आहेत. एसटी बस चालकाच्या बाजूला असलेल्या सीटच्या मागे ते ठेवले असल्याचे दिसले. त्यातील अनेक सिलिंडर फक्त नावाला आहेत. त्यांची वैधता तपासली जात नाही. प्रथमोपचार पेटी ठेवली जात नाही. काही गाड्यांमध्ये प्रथमोपचार पेटी आहे. मात्र, त्यात साहित्य काहीच नाही. चालकांनी याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर आम्हाला याचे प्रशिक्षणच नसल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST fire in Solapur damages 10 lakh