कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने स्टेट बॅंक शाखेचे व्यवहार ठप्प 

state bank.jpg
state bank.jpg

मंगळवेढा(सोलापूर)ः शहरातील बॅंक ऑफ इंडिया पाठोपाठ सर्वात मोठी बॅंक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेत एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे शनिवारपासून बॅंकेचे आर्थिक व्यवहार बंद असल्यामुळे बॅंक खातेदारांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. 

कोरोनाचे रुग्ण शहर व ग्रामीणमध्ये वाढत आहेत. अशा परिस्थितीत बॅंक व्यवस्थापनाने पुरेपूर जबाबदारी घेतली असताना देखील खातेदाराच्या संपर्काने की कर्मचाऱ्याच्या अंतर्गत संपर्कामुळे एक कर्मचारी पॉझीटीव्ह आढळला. संसर्गाची साखळी वाढू नये म्हणून आर्थिक व्यवहार बंद ठेवण्याबाबत नगरपालिकेच्या पत्र दिल्यामुळे व्यवहार बंद ठेवले. त्यामुळे खातेदारांना पैसे काढणे व भरण्यासाठी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. 

बॅंकेने पर्यायी व्यवस्था म्हणून शहरांमध्ये कार्यान्वित केलेल्या ग्राहक सेवा केंद्रात गत महिन्यात गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे या केंद्रावर पैसे काढण्यासाठी खातेदाराची मानसिकता होत नाही. त्यामुळे ग्राहक थेट बॅंकेत व्यवहाराला अधिक पसंती देतात. ऑनलाइन व्यवहारात उद्भवलेल्या समस्याचे निराकरण बॅंकेकडून केले जात नसल्यामुळे बहुतांश खातेदाराकडून फोन पे व गुगल पे वापरण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. 
अशा परिस्थितीत जे खातेदार एटीएमचा वापर करतात. काही वेळेला एटीएम मध्ये देखील पैशाचा खडखडाट असल्यामुळे खातेदारांना पैशासाठी ताटकळत राहावे लागत आहे. कोरोना संकटात शासनाने अनुदान आगाऊ स्वरूपात दिले. आता या शासनाने श्रावण बाळ व संजय गांधी योजनेतील 9 हजार खातेदाराचे अनुदान बॅंकेकडे वर्ग केल्यामुळे काही ज्येष्ठ नागरिकांना गेल्या चार महिन्यांपासून अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागली. बॅंक बंद असल्यामुळे अनुदान वाटपाबाबत असून अडचण नसून खोळंबा असा झाला आहे. शासकीय कार्यालयाचे अनुदान खाते याच बॅंकेत असल्यामुळे त्यांनादेखील आता शासकीय अनुदानासाठी बॅंक उघडेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे 

ग्राहकांना सेवा द्याव्यात 
खातेदारांना मास्क व सॅनेटायझर वापरल्याशिवाय आत सोडले जात नाही त्यामुळे खातेदाराकडून संसर्ग होणे अशक्‍य आहे. उलट कर्मचाऱ्याकडून संसर्ग झाल्याने त्याचे तात्काळ विलगीकरण करून बॅंक सुरू ठेवून या संकटात तात्काळ सुविधा उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. 
- धनाजी सरवदे वंचित बहुजन आघाडी 

लवकरच व्यवहार सुरळीत 
आज रिपोर्ट येण्याच्या प्रतीक्षेत आहोत. रिपोर्ट आल्यास उद्यापासून बॅंक व्यवहार पूर्ववत सुरू होतील. 5 दिवस व्यवहार बंद असले तरी अंतर्गत 9 हजार लोकांचे अनुदान जमा केले आहेत. व्यवहार सुरू होतात खातेदारांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. 
- धनंजय देशपांडे, प्रबंधक भारतीय स्टेट बॅंक  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com