एसटी गाड्यांना आता प्रवाशांची प्रतीक्षा

st.jpg
st.jpg

मंगळवेढा(सोलापूर)ः जिल्हाअंतर्गत एसटी सेवा सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात कोरोनाच्या संकटात प्रवाशी बाहेर पडण्यास तयार नसल्याने एसटी गाड्या बसस्थानकावर प्रवाशांच्या प्रतिक्षेत उभ्या कराव्या लागत आहेत. 

24 मार्चपासून कोरोनाची साखळी रोखण्यासाठी लॉकडाउन केल्यामुळे मंगळवेढा आगाराच्या शहर व ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या बंद केल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. सध्या काही अटी शिथिल केल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी मुभा दिली आहे. एसटी महामंडळाने बाधित नसलेल्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली सुविधा प्रवाशांसाठी सुरू केली. 

परंतु प्रवाशांचा प्रतिसाद नसल्यामुळे एसटी बसस्थानकावरील प्लॅटफॉर्मवरील लालपरीला प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागली. शहर व ग्रामीण भागाशी जोडणारी जीवनवाहिनी म्हणून एसटीकडे पाहिले जाते. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला. कर्मचाऱ्यांना घरी बसून दिवस काढावे लागत आहेत. कोरोना संसर्ग शेजारील तालुक्‍यात येऊ लागल्याने तालुक्‍यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. 
अशा परिस्थितीत काल एसटीने लवंगी आणि पंढरपूर या मार्गावर सुरू केल्या परंतु फक्त पाच प्रवासी होते. आज पुन्हा शिरनांदगी, बठाण मार्गावर फेऱ्या चालू केल्या. परंतु या सुविधांकडे प्रवाशांचा प्रतिसाद अतिशय थंड असून प्रवाशांच्या प्रतीक्षेत थांबून देखील प्रवासी मिळत नसल्यामुळे फलाटवर लावलेली बस आगारात परत न्यावी लागली. तर काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. 

रुग्ण सापडल्याने प्रवाशी झाले कमी 
बाधित नसलेल्या भागात फेऱ्या सुरू केल्या. नवीन फेऱ्या वाढवल्या पण प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे. त्यात शेजारील तालुक्‍यात रुग्ण सापडल्याने प्रवासी कमी होऊन एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला. 
- मधुरा जाधवर, आगार व्यवस्थापक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com