लालपरी अडकली रेड झोनमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली, मात्र शहरात बस आणण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे शुक्रवारी (ता. 22) सोलापूर शहर वगळता जिल्हाभर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या बस मार्गस्थ झाल्या. परंतु, लॉकडाउनने आणि कोरोना भीतीने अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही, असे महामंडळातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले. सोलापूरसह राज्यभरातील परिवहन महामंडळची बससेवा तेथील स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनुसार सुरू झाली आहे.

सोलापूर: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने 22 मार्चला देशभर लॉकडाउन जाहीर केले. आता दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लालपरी धावली, मात्र शहरात कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने एकाही बसला शहरात प्रवेश देण्यात आला नाही. परिवहन महामंडळाच्या बसने जिल्ह्यात विविध ठिकाणी 186 फेऱ्या केल्या. तेव्हा जिल्ह्यातील अवघ्या 416 प्रवाशांनी बसमधून प्रवास केला. त्यामुळे "नाकापेक्षा मोती जड' अशी अवस्था महामंडळाची झाल्याचे दिसले. 

हेही वाचाः माळशिरस तालुुक्‍यात कामगारांना वाचविणाऱ्या शेतकऱ्यावरच गून्हा 

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली, मात्र शहरात बस आणण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे शुक्रवारी (ता. 22) सोलापूर शहर वगळता जिल्हाभर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या बस मार्गस्थ झाल्या. परंतु, लॉकडाउनने आणि कोरोना भीतीने अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही, असे महामंडळातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले. सोलापूरसह राज्यभरातील परिवहन महामंडळची बससेवा तेथील स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनुसार सुरू झाली आहे. मात्र, जिल्हाबंदी व रेड झोन अंतर्गत शहरांत बस घेऊन येण्यास बंदी असल्याने "उत्पन्नापेक्षा खर्चच मोठा' झाल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचाः सोलापूरातून या हवाई वाहतूकीला परवानगी 

एकही बस शहरात येणार नाही 
जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर 22 मार्चपासून पहिल्यांदाच जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. शहरात कोरोना विषाणूचा विळखा वाढत असल्याने एकही बस शहरात येणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. त्यानुसार पहिल्या दिवशी लालपरीने जिल्ह्यात 186 फेऱ्या केल्या. तेव्हा 416 प्रवाशांनी बसमधून प्रवास केला. 
- रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, सोलापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state transport stopped in redzone