"स्टूडंट पोलिस कॅडेट'मुळे विद्यार्थ्यांना सामाजिक भान!

परशुराम कोकणे
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, सामाजिक संवेदनशीलता, भ्रष्टाचार निर्मूलन, महिला व बालकांची सुरक्षितता, गुन्ह्यांचा प्रतिबंध, नीतिमूल्ये, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन आणि स्वच्छता या विषयावर पोलिसांकडून "स्टूडंट पोलिस कॅडेट'मधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

सोलापूर : गुन्हेगारांचा शोध, अवैध धंद्यावर नियंत्रण, अपघातानंतर जखमींना मदत, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आदी कर्तव्ये पार पाडणाऱ्या पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या "स्टूडंट पोलिस कॅडेट' उपक्रमामुळे सकारात्मक बदल दिसून येत आहेत. राज्यातील 354 शाळांमधील 10 हजाराहून अधिक विद्यार्थी "स्टूडंट पोलिस कॅडेट'च्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्‍नांवर काम करण्यासाठी सज्ज होत आहेत. 

Image may contain: 3 people, people standing and outdoor

भारीच की..! शिक्षिकांनी नेली माता पालकांची सहल 

प्रत्येक शाळेला 50 हजार रुपये
राज्यातील 354 सरकारी शाळांमधील इयत्ता 8 वी आणि 9 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्टूडंट पोलिस कॅडेट योजना राबविण्यात येत असून यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह मंत्रालयाकडून गेल्या आठवड्यात 1 कोटी 77 लाख इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात दिली आहे. प्रत्येक शाळेला 50 हजार रुपये देण्यात येतील. या रकमेतून स्टूडंट पोलिस कॅडेट उपक्रमासाठी साहित्य खरेदी, प्रशिक्षण घेणे, बाह्यवर्ग भेटी आणि इतर खर्च करता येणार आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 17 शाळांमध्ये 500 हून अधिक विद्यार्थ्यांचा स्टूडंट पोलिस कॅडेट'मध्ये समावेश आहे. 

पोलीस आयुक्तालय शहर STUDENT POLICE CADET PROGRAMME

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, सामाजिक संवेदनशीलता, भ्रष्टाचार निर्मूलन, महिला व बालकांची सुरक्षितता, गुन्ह्यांचा प्रतिबंध, नीतिमूल्ये, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन आणि स्वच्छता या विषयावर पोलिसांकडून "स्टूडंट पोलिस कॅडेट'मधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

लेकीच्या लग्नमंडवळ्या घेऊन निघालेल्या पित्यावर काळाचा घाला 

Image may contain: 1 person, standing, shoes, tree and outdoor

गणवेशाची प्रतिक्षा...! 
पोलीस दल आधुनिकीकरण या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत "स्टूडंट पोलिस कॅडेट' हा उपक्रम देशभरात राबवण्यात येत आहे. 2018 साली केरळमध्ये या उपक्रमाला सुरवात झाली. या उपक्रमासाठी केंद्र शासनाकडून 60 टक्के तर राज्य शासनाकडून 40 टक्के निधी उपलब्ध केला जात आहे. देशात अनेक ठिकाणी "स्टूडंट पोलिस कॅडेट'च्या विद्यार्थ्यांना पोलिसांसारखा खाकी रंगाचा गणवेश देण्यात आला आहे. आपल्याकडे मात्र अद्याप विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतिक्षा आहे. 

स्टूडंट पोलिस कॅडेटचे यंदा पहिलेच वर्ष आहे. शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून पोलिसांची कार्यप्रणाली, सामाजिक समस्या, वाहतूकीची जनजागृती यासह इतर विषयांची माहिती दिली जात आहे. भ्रष्टाचार कसा होतो, महिलांच्या समस्या काय आहेत, अडचणीच्या काळात काय करावे हेही विद्यार्थ्यांना सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांचा समाजातील प्रश्‍नांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. 
- विजयानंद पाटील, 
सहायक पोलिस निरीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student police cadet news