आमदार भालकेंच्या कोरोनामुक्तीसाठी समर्थकांचे ग्रामदैवतांना साकडे 

Bhalke
Bhalke

मंगळवेढा (सोलापूर) : जनसंपर्कामुळे आमदार भारत भालके यांची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते लवकर कोरोनामुक्त व्हावेत यासाठी त्यांच्या समर्थकांनी शहर व ग्रामीण भागातील ग्रामदैवतांना अभिषेक घालून प्रार्थना केली. 

आमदार भालके यांनी तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टी व महापुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा करत लोकांशी थेट संवाद साधला. पुरामुळे व अन्य कारणांनी मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. यादरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. 

आमदार भालके यांच्यावर रुबी हॉस्पिटल, पुणे येथे उपचार चालू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शहरातील गैबीसाहेब दर्गा, सिद्धेश्वर मंदिर(माचणूर), महालिंगराया मंदिर (हुलजंती), गणपती मंदिर (सिद्धापूर), बाळकृष्ण महाराज मंदिर (नंदेश्वर), हनुमान मंदिर (पाठखळ), लक्ष्मीदेवी मंदिर (लक्ष्मी दहिवडी), बिरोबा मंदिर (हुन्नूर),बागडे बाबा मंदिर (मारोळी), खुपसंगी येथील दर्गा आदी ठिकाणी आमदार भालके यांची कोरोनातून मुक्तता व्हावी, अशी प्रार्थना त्यांच्या समर्थकांनी केली. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ठिकठिकाणची मंदिरे बंद असल्याने बाहेरच ग्रामदैवतांकडे प्रार्थना केली. 

या वेळी बसवराज पाटील, नागराज जमखंडी, शिवकुमार पाटील, रेवण हत्ताळी, ब्रह्मदेव हाके, शिवगोंडा पाटील, प्रकाश पाटील, महादेव लोखंडे, भिवाजी दोलतडे, ज्ञानेश्वर मेटकरी गुरुजी, गेना दोलतोडे, बापू मेटकरी, अशोक दोलतडे, लक्ष्मी दहिवडीत डॉ. प्रशांत पाटील, अनिल आदलिंगे, महेश स्वामी, शेलार शेळके, सिद्धापुरात दयानंद सोनगे, संतोष सोनगे, किसन भजनावळे, माचणूर येथे सुनील डोके, भारत बेदरे, महादेव फराटे, धनंजय गायकवाड, हुलजंतीत उमाकांत कनशेट्टी, मधुकर गंगमई, मारुती पेट्रर्गी, खुपसंगीत शहाजान पटेल, कुशाबा पडवळे, सिद्धेश्वर रूपनर, पाठखळ येथे हर्षराज बिले यांच्यासह अनेक गावातील समर्थक उपस्थित होते. 

तसेच आमदार भारत भालके व विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके कोरोनामुक्त व्हावेत म्हणून बिरोबा मंदिरात अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी चेअरमन बसवराज पाटील, माजी सभापती तानाजी काकडे, माजी सरपंच जगन्नाथ रेवे, हुन्नरचे सरपंच मच्छिंद्र खताळ, बिरोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष राजाराम पुजारी, रेवेवाडीचे सरपंच ब्रह्मदेव रेवे, गुलाब थोरबोले, माजी सरपंच यशवंत होळकर, शिवाजी पुजारी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com