रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार वाघमारे यांचा संशयास्पद मृत्यू 

kumar waghmare2.jpg
kumar waghmare2.jpg

मंगळवेढा(सोलापूर) ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पश्‍चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कुमार विठ्ठल वाघमारे यांचा मंगळवेढा येथील एमआयडीसीमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने मंगळवेढा व माढा तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

कुमार वाघमारे यांची मंगळवेढा येथील एमआयडीसीमध्ये मागासवर्गीय संस्था आहे. ते मोडनिंब येथून घरातून मंगळवेढ्याला जाऊन येतो, असे सांगून निघून गेले होते, मात्र काल त्यांच्या मृत्यूचे वृत्त मोडनिंब मध्ये सर्वत्र समजले. तेव्हा कार्यकर्ते, नातेवाईक समर्थकांनी मंगळवेढ्याकडे धाव घेतली. या ठिकाणी कुमार वाघमारे हे संशयास्पद मृतावस्थेत निदर्शनास आले. त्यांचा मृत्यू कसा झाला...? का झाला ? हे शवविच्छेदन झाल्यानंतर समजणार आहे. 


दरम्यान पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत त्यांनी मयत इसम 15 ते 19 सप्टेंबर च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होऊन पुढील तपासाची दिशा स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाघमारे हे सोलापूर जिल्ह्यात पॅंथरच्या चळवळी पासून सामाजिक कामाबरोबर राजकीय कामांमध्ये देखील अग्रेसर होते. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले व माजी मंत्री राजाभाऊ सरवदे यांचे एकनिष्ठ समर्थक म्हणून देखील मोठी ओळख होती. 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com