सोलापूर पोलिस अधीक्षकपदी तेजस्वी सातपुते ! शुक्रवारी घेणार पदभार 

तात्या लांडगे
Wednesday, 7 October 2020

सर्वांना सोबत घेऊन चांगले काम करु 
सध्या कोरोनाचा काळ असून जिल्ह्याला कोरोनातून मुक्‍त करण्याला प्राधान्य दिले जाईल. ग्रामीण भागातील जनतेला शांतता व सुव्यवस्थेचे प्रशासन देण्यावर भर असणार आहे. दोन दिवसांत पदभार स्वीकारणार असून सर्वांना सोबत घेऊन चांगले काम करु. 
- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर 

सोलापूर : सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची नगरला बदली झाली आहे. त्यांच्या रिक्‍तजागी आता साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. गृह विभागाने (बुधवारी) चार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. 

 

भारतीय पोलिस सेवेतील अशोक दुधे यांची बदली होऊनही त्यांना पदभार मिळालेला नव्हता. त्यांची रायगडच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर तेजस्वी सातपुते यांच्या सोलापुरातील बदलीनंतर अजयकुमार बन्सल यांची नियुक्‍ती साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकपदी करणयत आली आहे. जळगावचे सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांची बदली झाली असून त्यांना त्याच ठिकाणी सहायक पोलिस अधीक्षकपदी नियुक्‍ती देण्यात आली आहे. अनिल पारस्कर यांची रायगड, निलभ रोहन यांची सहायक पोलिस अधीक्षक, जळगाव यांची बदली करण्यात आली आहे. परंतु, त्यांच्या पदस्थापनेबाबत स्वतंत्र आदेश काढले जातील, असेही गृह विभागाने आदेशात म्हटले आहे. पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती विचारात घेऊन बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर राहावे. तत्पूर्वी, त्यांचा मूळ पदभार सोडावा आणि त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असेही आदेश गृह विभागाने दिले आहेत. 

सर्वांना सोबत घेऊन चांगले काम करु 
सध्या कोरोनाचा काळ असून जिल्ह्याला कोरोनातून मुक्‍त करण्याला प्राधान्य दिले जाईल. ग्रामीण भागातील जनतेला शांतता व सुव्यवस्थेचे प्रशासन देण्यावर भर असणार आहे. दोन दिवसांत पदभार स्वीकारणार असून सर्वांना सोबत घेऊन चांगले काम करु. 
- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tejaswi Satpute to take over as Solapur Superintendent of Police