सोलापूरच्या ओंकारने स्वत: बनविली दुर्बिण

-
-

सोलापूर : येथील ऑर्किड महाविद्यालयात शिकणाऱ्या ओंकार काटेगावकर याने स्वःता दुर्बिण बनविले आहे. ओंकारने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे "अग्निपंथ' हे पुस्तक वाचले. तेव्हापासून त्याचा विज्ञानातील रस खूप वाढला. त्यानंतर विद्युत ऊर्जा निर्मितीवर काम करायला त्याने सुरुवात केल्यानंतर त्याने दुर्बिण बनविली. 

ऍस्ट्रोम ऍस्ट्रोनॉमिकल क्‍लब हा विज्ञान व खगोल विषयाची जागृती करणारा क्‍लब आहे. "जिज्ञासा हीच खरी ज्ञानाची पहिली पायरी' असे म्हणले जाते. विज्ञानाचा प्रवास हा जिज्ञासापासून अभ्यासाकडे त्यानंतर प्रयोग आणि यशातून समाजाच्या कल्याणाकडे जातो. ओंकारने बी. ई. सिव्हील इंजिनिअरची पदवी प्राप्त केली. त्याला लहानपणापासून कागदी विमानाचे नवनवीन प्रकार, रात्रीच्या आकाशातील ताऱ्यांचे नकाशे, इलेक्‍ट्रिक खेळण्यापासून ऊर्जा निर्मितीचे उपकरण अशा अनेक नवनवीन गोष्टी बनवायची आवड आहे. 
ओंकारने छोट्या- छोट्या वस्तूंपासून खूप उपकरणे बनविली आहेत. त्यानंतरही त्याची विज्ञानामध्ये गोडी वाढ गेली. त्यामुळे त्याने निश्‍चय केला आणि विज्ञानाकडे वळाला. लहानपणापासून त्याला आकाशातील चंद्र, तारे, सूर्यमालेचे आकर्षण असायचे. हे सर्व कसे बनले जाते याबद्दल त्याला कुतुहल होते. त्याकरिता आकाश निरीक्षणासाठी पहिल्यांदा त्याने दुर्बीण पाहिली. दुर्बीण पाहताक्षणी त्याला असे वाटले की आपणही ही दुर्बिण बनवावी. सोलापूरात दुर्बिणची माहिती मिळण्यासाठी अनेक ठिकाणी त्याने विचारपूस केली. परंतु, योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. त्यामुळे पुस्तके वाचून, इंटरनेटवर सर्च करुन, वेगवेगळ्या साइटवरील माहिती गोळा केली. सर्व गोष्टींवर रिसर्च केले. त्यानंतर स्वत: ओंकारने दुर्बिण बनवले. जवळपास 100 दुर्बिण फेल गेले. हे तयार करण्यास त्याला 50-60 दिवस लागले. त्यानंतर दुर्बिण पूर्ण यशस्वीरित्या तयार झाली. त्याने दुर्बिणची डिझाइन स्वत: तयार केली. दोन महिने कष्ट करुन त्याने दुर्बिण तयार केली आहे. त्याची दुर्बिण 2जागतिक विज्ञान दिन विशेष015 मध्ये पूर्ण झाली. ओंकारने जे ठरवले त्याला यश आल्याने तो आनंदीत झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com