esakal | अक्कलकोट संस्थानाचा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार दुर्बीण बुरुज पावसाने ढासळला
sakal

बोलून बातमी शोधा

The telescope tower, which witnessed many historical events of Akkalkot Sansthan, collapsed due to rain.jpg

अक्कलकोटचा अभिमान असलेला त्याच वास्तूतील दुर्बीण बुरुजाचा काही भाग आजच्या पावसाने ढासळला आहे. सदर वास्तूची निर्मिती ३७३ वर्षांपूर्वी झालेली आहे. 

अक्कलकोट संस्थानाचा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार दुर्बीण बुरुज पावसाने ढासळला

sakal_logo
By
राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : छत्रपती शाहू महाराज (संभाजी राजे यांचे पूत्र) यांनी अक्कलकोट संस्थानची निर्मिती १७०७ साली केली. तेव्हा निर्मिलेला दिमाखदार वास्तू म्हणजे अक्कलकोटचा जुना राजवाडा आहे. अक्कलकोटचा अभिमान असलेला त्याच वास्तूतील दुर्बीण बुरुजाचा काही भाग आजच्या पावसाने ढासळला आहे. सदर वास्तूची निर्मिती ३७३ वर्षांपूर्वी झालेली आहे. 

कित्येक वर्षांपासूनचा जूना राजवाड्याचा ऐतिहासिक दुर्बिण बुरुजाचा काही भाग ढासळला आहे. अक्कलकोट संस्थान गादीची स्थापना पहिले श्रीमंत फत्तेसिंह राजे भोसले यांनी केली. तर सध्या अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले वारसदार आहेत. अक्कलकोट संस्थानच्या ऐतिहासिक जूना राजवाड्याच्या पूर्वे कडील दुर्बिण बुरुज ढासळला. या ऐतिहासिक राजवाड्याने अनेक सुखदुःखाचे क्षण अनुभवले होते. पहिल्या फत्तेसिंह राजे भोसले यांनी अनेक पराक्रम केले होते. राजघराण्याचा मुख्य दरबार देवघर यांचे वास्तू आहे. अशा या वास्तूचा बुरजू ढासळल्याने याची पुन्हा बांधणी व देखभाल संस्थानकडून व्हावे आणि अक्कलकोटचे वैभव कायम ठेवावे, अशी सुज्ञ नागरिक अपेक्षा व्यक्त करीत आहेत.

हे ही वाचा : अक्कलकोट तालुक्यात धुवांधार पाऊस 

अक्कलकोटचे संस्थान मानकरी बाबासाहेब निंबाळकर म्हणाले, पूर्वी राजेशाही काळात फितुरी व्हायची तर आताच्या काळात देखभालीसाठी ठेवलेली माणसे ही अक्षम्य दुर्लक्ष करून या ऐतिहासिक वास्तूंच्या पडझाडीसाठी कारणीभूत ठरत आहेत. संस्थानाकडे अधिक लक्ष देऊन अक्कलकोटकरांचे अभिमान असलेली ही वास्तू देखभाल करून पडझड झालेले भाग पुन्हा पूर्ववत करून लोकभावना कायम ठेवावेत. 


संपादन - सुस्मिता वडतिले 

go to top