रात्री आठ ते दहापर्यंतच फटाक्‍यांसाठी वेळ ! दिवाळीत वाढला 'ध्वनी'चा टक्‍का; पोलिसांचा कानाडोळा

तात्या लांडगे
Monday, 16 November 2020

लक्ष्मी पुजनादिवशी 75 डेसिबलपर्यंत आवाज 
फटाक्‍यांच्या मोठ्या आवाजामुळे वयस्क नागरिकांना त्रास होतो. तर फटाक्‍यांच्या धुरामुळे श्‍वसनाचा त्रास होतो. कोरोना काळात नागरिकांना श्‍वसनाचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना राज्य सरकारने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. मात्र, पोलिसांकडून काहीच कारवाई होताना दिसत नाही. दुसरीकडे शहरात सकाळ, दुपारी आणि रात्री फटाक्‍यांचा आवाज येऊनही अद्याप एकावरही कारवाई झालेली नाही. दुसरीकडे पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर यांनी वेळेची उजळणी करीत रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत नागरिकांना फटाके वाजविण्यास परवानगी असल्याचे सांगितले. कारवाईबद्दल त्या काहीच बोलल्या नाहीत. शहरातील ध्वनीचा टक्‍का लक्ष्मी पुजनादिवशी (ता. 14) वाढल्याचे निरीक्षण प्रदुषण नियंत्रण मंडळाने नोंदविले आहे.

सोलापूर : मोठ्या आवजाचे फटाके फोडू नका, दिपावली पहाट साजरा करु नका, फटाक्‍यांच्या आवाजाने व धुरामुळे को- मॉर्बिड रुग्णांना त्रास होईल. त्यामुळे कोरोना काळात साधेपणाने दिवाळी साजरा करावी, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले. दरवर्षी सणासुदीत शहरांमध्ये फटाक्‍यांच्या आवाजाचा मोठा त्रास नागरिकांना सोसावा लागतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी आहे. तरीही शहरात अवेळी फटाक्‍यांचा मोठा आवाज येत असतानाही पोलिसांकडून त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचे चित्र आहे.

लक्ष्मी पुजनादिवशी 75 डेसिबलपर्यंत आवाज 
फटाक्‍यांच्या मोठ्या आवाजामुळे वयस्क नागरिकांना त्रास होतो. तर फटाक्‍यांच्या धुरामुळे श्‍वसनाचा त्रास होतो. कोरोना काळात नागरिकांना श्‍वसनाचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना राज्य सरकारने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. मात्र, पोलिसांकडून काहीच कारवाई होताना दिसत नाही. दुसरीकडे शहरात सकाळ, दुपारी आणि रात्री फटाक्‍यांचा आवाज येऊनही अद्याप एकावरही कारवाई झालेली नाही. दुसरीकडे पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर यांनी वेळेची उजळणी करीत रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत नागरिकांना फटाके वाजविण्यास परवानगी असल्याचे सांगितले. कारवाईबद्दल त्या काहीच बोलल्या नाहीत. शहरातील ध्वनीचा टक्‍का लक्ष्मी पुजनादिवशी (ता. 14) वाढल्याचे निरीक्षण प्रदुषण नियंत्रण मंडळाने नोंदविले आहे.

गुरुनानक चौक परिसर, लष्कर, गांधी नगर, रेल्वे लाईन, नवी पेठ, साखर पेठ, मधला मारुती, जुळे सोलापूर या भागात फटाक्‍यांचा मोठा आवाज सातत्याने कानावर पडतो. मात्र, गुरुनानक चौक परिसरापासून हाकेच्या अंतरावरील पोलिस आयुक्‍तालयात याचा आवाज जात नसल्याचे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. कोरोना काळात कमी झालेले हवा व ध्वनी प्रदूषण आता अनलॉक काळात पुन्हा वाढू लागल्याचे निरीक्षण प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदविले आहे. दिवाळीनिमित्त वाजणाऱ्या फटाक्‍यांच्या आवाजातील तीव्रता आणि हवा प्रदूषणाबद्दल स्वतंत्र सर्व्हे करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले होते. त्यानुसार शहरातील विजयपूर रोड, होटगी रोड, नवी पेठ, सात रस्ता यासह अन्य चार ठिकाणचे निरीक्षण प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदविले. त्यानुसार शहरातील ध्वनीची पातळी 75 डेसीबलपर्यंत (तीव्र) असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत भोसले यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Time for firecrackers from 8 to 10 at night ! The percentage of 'sound' increases on Diwali; legal actions avoid of the police