राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे शुक्रवारी काळ्या फिती लावून आंदोलन

 Today's black ribbon agitation of the state government
Today's black ribbon agitation of the state government

सोलापूर : प्रमुख 11 राष्ट्रीय संघटनांनी उद्या (ता. 22) देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात जिल्हा परिषद आणि राज्य सरकारी कर्मचारी सामील होऊन शासनाचे लक्ष वेधणार आहेत.


महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि राज्य सरकारी मध्यवर्तीच्या संघटनेच्या संयुक्त नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे.

कामगार कायद्यांना स्थगिती देण्यात येऊ नये, केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते कपात करू नये, कोरोनाच्या नावाखाली केंद्र सरकारने, राज्य सरकारने खासगीकरणाला गती देऊ नये, कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा, विमा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, सर्व विभागांतील 55 वर्षांवरील तसेच मधुमेह, रक्तदाब आणि दुर्धर आजाराने ग्रस्त आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना सूट मिळावी, कर्मचाऱ्यांना प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्याबाबत सरकारने रोड मॅप तयार करावा आणि या भरतीमध्ये अनुकंपा तत्त्वावरील भरतीला प्राधान्य द्यावे, आर्थिक सुधारणांकरिता विशेषतः महसूल वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि मध्यवर्ती संघटनेला संयुक्तरीत्या तातडीने चर्चेला पाचारण करावे या मागण्यांसाठी उद्या दिवसभर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन काम करताना अथवा घरी काळ्या फिती लावून काम करावे असे आवाहन विभागीय सहसचिव रमाकांत साळुंखे, जिल्हाध्यक्ष राजेश देशपांडे, अनंत माने, राहुल गरड, रमेश कोळी, चंद्रकांत पाटील, सुनीता देवकर, सुनंदा सुरवसे, सुरेखा जवळकर, लक्ष्मण गळगुंडे यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com